IMPIMP

Monkeypox Cases Rise | मंकीपॉक्सला रोखण्यासाठी WHO चा सल्ला; म्हणाले – ‘सेक्स पार्टनर्सची संख्या कमी करा’

by nagesh
Monkeypox Cases Rise | who chief tedros ghebreyesus advises to reduce sex partners as monkeypox cases surge

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Monkeypox Cases Rise | मंकीपॉक्स (Monkeypox) चा धोका जगभरात सातत्याने वाढत आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस अ‍ॅधानोम गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी सल्ला दिला आहे की ज्या पुरुषांना मंकीपॉक्सचा धोका आहे त्यांनी सध्यातरी लैंगिक साथीदारांची संख्या मर्यादित ठेवण्याचा विचार करावा. अलीकडेच, WHO ने मंकीपॉक्स महामारीला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले. (Monkeypox Cases Rise)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

78 देशांमध्ये मंकीपॉक्सची 18 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापैकी सुमारे 70 टक्के प्रकरणे युरोपमधील आहेत. बहुतेक संक्रमण पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणार्‍या पुरुषांमध्ये झाले आहे, विशेषत: अनेक लोकांशी लैंगिक संबंध ठेवणार्‍या पुरुषांमध्ये. भारतात सध्या चार प्रकरणे आहेत. यापैकी तीन केरळमधील असून एका प्रकरणाची दिल्लीत पुष्टी झाली आहे.

 

’न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’ मध्ये प्रकाशित संशोधनानुसार, 95 टक्के प्रकरणे लैंगिक क्रियांद्वारे प्रसारित केली गेली आणि संक्रमित झालेल्यांपैकी 98 टक्के समलिंगी किंवा उभयलिंगी (स्त्री आणि पुरुष दोघांसोबत लैंगिक संबंध ठेवणारे) पुरुष होते. 528 संक्रमित लोकांवर संशोधन करण्यात आले आहे. (Monkeypox Cases Rise)

 

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी मंकीपॉक्सची लागण झालेल्यांना विलगीकरणात राहण्याचा सल्ला आहे.
तसेच गर्दीच्या ठिकाणी इतरांच्या संपर्कात येऊ नये असे सांगितले आहे.
अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्रांनी पुरुषांसोबत शारिरीक संबंध ठेवणार्‍या पुरुषांना आपले सेक्स पार्टनर कमी करण्याचा सल्ला दिलेला नाही.
मात्र शरिरावर पुरळ असणार्‍यांना मंकीपॉक्सची लागण झाल्याची शक्यता असल्याने त्यांच्या त्वचेशी संपर्क होऊ देऊ नका असा सल्ला दिला आहे.

 

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, रुग्ण तसेच त्यांचे कपडे, बेडशीटच्या संपर्कात आलेल्या कोणालाही मंकीपॉक्सची लागण होऊ शकते.
संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य संस्थेने मुले, गर्भवती महिलांना जास्त धोका असल्याचा इशारा दिला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : – Monkeypox Cases Rise | who chief tedros ghebreyesus advises to reduce sex partners as monkeypox cases surge

 

हे देखील वाचा :

Mamata Banerjee | ममता बॅनर्जी अ‍ॅक्शन मोडमध्ये ! घोटाळ्यात नाव येताच पार्थ चॅटर्जींची मंत्री पदावरून हकालपट्टी

Sonia Gandhi – Smriti Irani | ‘Don’t Talk to me’ संसदेत स्मृती इराणी आणि सोनिया गांधींमध्ये शाब्दीक चकमक

Gondia Accident | कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात चार मित्रांचा जागीच मृत्यू, गोंदिया मधील घटना

 

Related Posts