IMPIMP

Pune News | विहीरीत पडलेल्या 42 वर्षाच्या महिलेचे अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले प्राण, पुण्याच्या सोमवार पेठेतील घटना

by nagesh
Pune News | pune fire brigade rescue 42-year-old woman from well in somwar peth

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune News | विहिरीत पडलेल्या एका 42 वर्षाच्या महिलेचे अग्निशमन दलाच्या (Fire brigade) जवानांनी प्राण वाचवले. ही घटना पुण्यात (Pune News) आज (सोमवार) सोमवार पेठेतील पेशवेकालीन दांडेकर वाड्यात (Dandekar Wada) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली. पाणी भरण्यासाठी गेल्यानंतर पाय घसरून ही महिला विहिरीत पडली असल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी महिलेला बाहेर काढून उपचारासाठी के ई एम रुग्णालयात (KEM Hospital) दाखले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर ९Pradeep Khedekar) यांनी सांगितले. सोमवार पेठत (Somwar Peth)  दांडेकर वाडा असून या ठिकाणी एक पेशवेकालीन विहिर (well) आहे. या विहिरीत पालापाचोळा पडल्याने गाळ साचला आहे. या विहिरीत एक महिला पडल्याचा कॉल अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला (control room) आला. लगेचच मध्यवर्ती केंद्रातून एक बंब, देवदूत व रेस्क्यु व्हॅन (Rescue van) घटनास्थळी रवाना करण्यात (Pune News) आली. जवान घटनास्थळापर्यंत पोहचे पर्यंत ही महिला विहिरीतील गाळात फसली होती. महिला गाळात हळूहळू फसत असताना तातडीने रस्सी व लाईप रिंग टाकून तिला आवाज देऊन पकडण्यास सांगितले. तसेच जवानांनी विहिरीत उतरून महिलेच्या भोवती रश्शी बांधून  तिला तातडीने विहिरीबाहेर काढण्यात (Pune News) आले.

ज्यावेळी महिलेला विहिरीबाहेर काढण्यात आले त्यावेळी तिची शुद्ध हरपलेली होती. त्यामुळे तिला तातडीने के ई एम रुग्णालयात उपचारासाठी दाखल
करण्यात आले. डॉक्टरांनी तिला तातडीने अतिदक्षता विभागात (intensive care unit) भर्ती करुन तिच्यावर उपचार सुरु केले. उपचारानंतर काही
वेळाने महिला शुद्धीवर आली. या वाड्यात कोणीच राहात नसून विहिरीतील पाणी वापरले जात नसल्याचे दिसून येते. विहिरीजवळ पाण्याचा नळ असून
हि महिली पाणी भरण्यासाठी गेली असावी आणि पाय घसरुन विहिरीत पडली असावी (Pune News) असा प्राथमिक अंदाज आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

या कारवाईत अग्निशमन दलाचे अधिकारी प्रमोद सोनावणे ९Pramod Sonawane), प्रदीप खेडेकर, चालक हनुमंत कोळी, नवनाथ मांढरे तांडेल राजाराम केदारी व जवान छगन मोरे, सचिन जौंजाळे, प्रकाश शेलार, मयुर कारले, केतन नरके, विशाल गायकवाड यांनी सहभाग घेतला.

 

Web Title: Pune News | pune fire brigade rescue 42-year-old woman from well in somwar peth

 

हे देखील वाचा :

Hindustani Bhau | नवाब मलिकांविरोधात ‘हिंदुस्तानी भाऊ’चा एल्गार; म्हणाले – ‘कधीही आवाज द्या, मी साथ देईन, कारण…’

Pune Crime | भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांना न्यायालयाचा दणका, घोगरेंच्या अडचणीत वाढ

Madhuri Dixit | माधुरी दिक्षीतच्या मुलाचे लांब-घनदाट केस पाहून मुलीही लाजतील! ‘या’ कारणामुळे कापावी लागली वेणी

 

Related Posts