IMPIMP

Hindustani Bhau | नवाब मलिकांविरोधात ‘हिंदुस्तानी भाऊ’चा एल्गार; म्हणाले – ‘कधीही आवाज द्या, मी साथ देईन, कारण…’

by nagesh
BJP Mohit Kamboj | nawab malik bjp leader mohit kamboj charged fir after maliks arrest was show the sword

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन   – Hindustani Bhau | मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे अनेक नवनव्या घडामोडी घडत आहेत. यातच राष्ट्रवादी काॅग्रेसचे नेते (NCP) आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर वारंवार आरोप केले आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही जोरदार आरोप केला. तसेच, मलिकांनी भाजपा (BJP) युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावर 1100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभुमीवर आता सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारे हिंदुस्तानी भाऊने (Hindustani Bhau) उडी घेतली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

मलिकांनी (Nawab Malik) मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावर 1100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे.
तसेच आर्यन खान अपहरण आणि वसुलीचा मास्टरमाईंड मोहित कंबोज असल्याचा दावा मलिकांनी केला.
यानंतर यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत.
दरम्यान, हिंदुस्तानी भाऊने (Hindustani Bhau) मोहित कंबोज यांच्या पाठिंब्यासाठी व्हिडीओ तयार केला आहे.
त्या व्हिडिओतुन असं सांगण्यात येत आहे की, मोहित कंबोज तुम्ही खूप चांगले काम करत आहात.
तुम्ही नशेडी, गंजेडी लोकांविरोधात तुम्ही जे आंदोलन उभं केले आहे.
जे पाऊल उचललं आहे त्याच्या सपोर्टसाठी मी तुमच्यासोबत आहे.
तुम्ही जेव्हा कधीही तुम्ही बोलावल मी प्रत्येकवेळी हजर असेन, असं हिंदुस्तानी भाऊने म्हटले आहे.

 

कोण आहे हिंदुस्तानी भाऊ?

 

हिंदुस्तानी भाऊ (Hindustani Bhau) म्हणजे विकास जयराम पाठक (Vikas Jayaram Pathak) हा जन्माने मुंबईकर आहे.
तो आई-वडील, पत्नी आणि मुलगा आदित्य यांच्यासह मुंबईत राहतो.
पुलवामा हल्ल्यानंतर भारताविषयी बोलणाऱ्यांना चपराक लगावण्यासाठी त्याने सहजच एक व्हिडीओ बनवला होता.
या व्हिडीओला चांगले हिट्स मिळाले. विकासचे परत ‘हिंदुस्तानी भाऊ’ नाव प्रसिद्ध झाले.
दरम्यान, देशाविरोधात भाष्य करणाऱ्यांना ‘हिंदुस्तानी भाऊ’ त्याच्या शैलीत फिरकी घेतो.
भाऊचे टिकटॉकवर 6 लाखाहून अधिक फॉलोअर्स होते, तर यूट्युबवर तब्बल 10 लाखांपेक्षा अधिक सबस्क्राइबर्स आहेत.
रोखठोक आणि बेधडक भूमिकेसाठी हिंदुस्तानी भाऊची तरुणाईमध्ये एक क्रेझ आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Hindustani Bhau | i will support you bjp mohit kamboj says hindustani bhau over ncp leader nawab malik controversy

 

हे देखील वाचा :

Pune Crime | भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांना न्यायालयाचा दणका, घोगरेंच्या अडचणीत वाढ

Madhuri Dixit | माधुरी दिक्षीतच्या मुलाचे लांब-घनदाट केस पाहून मुलीही लाजतील! ‘या’ कारणामुळे कापावी लागली वेणी

Pune Crime | फसवणूक प्रकरण ! अलनेश सोमजीच्या पोलीस कोठडीत वाढ; पत्नी डिंपल सोमजीची येरवडा जेलमध्ये ‘रवानगी’

 

Related Posts