IMPIMP

Pune News | सक्सेस स्क्वेअर सोसायटीत रंगला भोंडल्याचा कार्यक्रम

by nagesh
Pune News | Rangala Bhondla's event at Success Square Society

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune News | कोथरुड येथील सक्सेस स्क्वेअर सोसायटीतील (Success Square Society, Kothrud) भोंडल्याला रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सोसायटीतील पन्नासहून अधिक महिला यामध्ये उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. नवरात्रीत चौथ्या माळेला देवीला केशरी रंगाची साडी नेसविली जाते. त्यामुळे भोंडल्यात सहभागी झालेल्या सर्व महिलांनीही केशरी रंगाच्या साड्या परिधान केल्याने सभागृहातील वातावरण भगवे (Pune News) झाले होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

एक लिंबू झेलू बाई… दोन लिंबे झेलू, ऐलमा पैलमा गणेशदेवा… अक्कण माती…चिक्कन माती… कारल्याचे वेल….श्रीकांता कमलाकांता… कृष्णा घालितो लोळण… हरीच्या नैवेद्याला…अशी भोंडल्याची पारंपारिक गाणी म्हणत महिलांनी फेर धरला. उत्स्फूर्त सहभागाने सोसायटीचे भलेमोठे सभागृहही अपुरे वाटू लागले. भोंडल्यात भाग घेणाऱ्या बऱ्याच सुवासिनी नव्या डिजिटल युगाच्या प्रतिनिधी असल्या तरी त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. भोंडल्यानंतर गरबा नृत्य सुरु झाले. गरबा नृत्यातही अबाल वृद्ध सर्वांच उत्साहाने सहभागी झाले.

भोंडला हा प्रामुख्याने महिलांचा कार्यक्रम. पण सोसायटीच्या भोंडल्यात संयोजक महिलांनी पुरुष वर्गालाही आमंत्रण देऊन सहभागी करून घेतले. त्यामुळे सोसायटीच्या भोंडल्याला कौटुंबिक सोहळ्याचे स्वरुप प्राप्त (Pune News) झाले होते.

मृणाल नलावडे, ऋतुजा नलावडे आणि तपस्या भास्कर यांनी हत्तीच्या चित्राभोवती सुरेख रांगोळी रेखाटली. सभागृहाच्या प्रवेशद्वारासमोरही रांगोळ्या रेखाटून आमंत्रितांचे स्वागत करण्यात आले.

खिरापत म्हणून इडली सांबर, डोसा आणि उपवासाच्या पदार्थ ठेवण्यात आले. सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला. मेधा काजळे यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. त्यांना महेश भास्कर, अभिषेक काजळे, नागेश नलावडे व प्रदीप काजळे आदींनी सहकार्य (Pune News) केले.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

Web Title : Pune News | Rangala Bhondla’s event at Success Square Society

 

हे देखील वाचा :

Mumbai Cruise Drugs Case | समीर वानखेडे यांच्या हेरगिरीमागे एखादा मोठा पोलीस अधिकारी? आर्यन खान ड्रग्ज केसच्या तपास अधिकार्‍याचा गंभीर आरोप

Pune Crime | पुण्याच्या बिबवेवाडीत थरार ! इयत्ता 8 वी मधील कबडीपट्टू मुलीचा कोयत्याने सपासप वार करून खून; एकतर्फी प्रेमातून घटना घडल्याचा संशय, प्रचंड खळबळ

Pune Crime | धक्कादायक ! पत्नीचा खून करुन मृतदेह पुरला; पुण्याच्या दौंड येथील घटना

 

Related Posts