IMPIMP

Mumbai Cruise Drugs Case | समीर वानखेडे यांच्या हेरगिरीमागे एखादा मोठा पोलीस अधिकारी? आर्यन खान ड्रग्ज केसच्या तपास अधिकार्‍याचा गंभीर आरोप

by nagesh
Mumbai Cruise Drugs Case | ncb zonal director sameer wankhede is investigating aryan khan drugs case complains that a senior police officer spying on him

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Mumbai Cruise Drugs Case | अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) चा मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) मुंबई क्रुझ ड्रग्ज केस (Mumbai Cruise Drugs Case) चा तपास करत असलेले NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर हेरगिरी केली जात आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दोन CCTV फुटेज सुद्धा दिले
समीर वानखेडे यांच्या हेरगिरीमागे एक मोठ्या पोलीस अधिकार्‍याचा हात आहे, अशी तक्रार समीर वानखेडे यांनीच केली आहे. समीर वानखेडे यांनी पुरावा म्हणून पोलिसांना याच्याशी संबंधीत दोन CCTV फुटेज सुद्धा दिले आहेत. अखेर समीर वानखेडे यांच्यावर कोण पाळत ठेवत आहे, या प्रश्नाचे रहस्य वाढत चालले आहे.

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर हेरगिरी सुरू?
एनसीपी नेते नवाब मलिक (Nawab Malik, NCP) यांनी आरोप केला होता की, क्रुझ ड्रग्ज पार्टीवर एनसीबीची छापेमारी बनावट होती. एनसीबीने भाजपा नेत्यांसोबत मिळून शाहरुख खानला टार्गेट केले आहे.

मोहित कंबोजवर केले होते गंभीर आरोप
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj, BJP) वर निशाणा साधत नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केला होता.

क्रुझवर एनसीबीसोबत होते भाजपा नेते
नवाब मलिक यांनी प्रश्न विचारला होता की, ज्यावेळी क्रुझवर छापेमारी झाली, त्यावेळी भाजपाचे काही नेते एनसीबीच्या टीमसह काय करत होते?

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत पुरावा म्हणून काही व्हिडिओ सुद्धा दाखवले होते. आता हा प्रश्न उपस्थित होत आहे की, समीर वानखेडे यांच्यावर हेरगिरी करण्याचे हे तर कारण नाही ना?

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

हेरगिरी करणारा एक व्यक्ती पोलीस अधिकारी
समीर वानखेडे यांच्या आईवर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले होते तिथे ते नेहमी जातात. 2015 पासून ते येथे येत आहेत.

याचा दरम्यान समीर वानखेडे यांना आढळले की सोमवारी (11 ऑक्टोबर) दोन संशयित लोक त्यांचा पाठलाग करत होते.
त्यांनी याच्याशी संबंधीत सीसीटीव्ही फुटेज सुद्धा काढले आहे.

पाठलाग करणारा एक मुंबई पोलीस दलाचा अधिकारी
समीर वानखेडे यांनी अशी दोन सीसीटीव्ही फुटेज आपल्या तक्रारीसोबत पोलिसाकडे सोपवले आहे.
समीर वानखेडे यांचे म्हणणे आहे की त्यांचा पाठलाग करणार्‍या दोन संशयितांपैकी एक मुंबई पोलिसात महत्वाच्या पदावर आहे.

वानखेडे यांनी पोलिसांकडे याचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे.
पोलीस या प्रकरणी तपास करत आहे. (Mumbai Cruise Drugs Case)

Web Title :- Mumbai Cruise Drugs Case | ncb zonal director sameer wankhede is investigating aryan khan drugs case complains that a senior police officer spying on him

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्याच्या बिबवेवाडीत थरार ! इयत्ता 8 वी मधील कबडीपट्टू मुलीचा कोयत्याने सपासप वार करून खून; एकतर्फी प्रेमातून घटना घडल्याचा संशय, प्रचंड खळबळ

Pune Crime | धक्कादायक ! पत्नीचा खून करुन मृतदेह पुरला; पुण्याच्या दौंड येथील घटना

Pune Corporation | पुणे महापालिका अधिकारी व पदाधिकार्‍यांसाठी ई-मोटारी भाडेतत्वावर घेण्याच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी

Related Posts