IMPIMP

Pune News | शास्त्रीय संगीत प्रसार आणि प्रचारासाठी संगीता कुलकर्णी तर युवा पुरस्कार रुपाली काळे यांना प्रदान

by nagesh
Pune News | Sangeeta Kulkarni and Rupali Kale awarded for classical music propagation and promotion

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune News | ब्राह्मण युनिटी फाउंडेशन आणि कै शरद गोगटे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संगीत
क्षेत्रातील नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने विविध पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. यावेळी या कलाकारांनी संगीत रजनी
कार्यक्रम सादर करून रसिकांची मने जिंकली. या कार्यक्रमात यावर्षीचा (२०२२) शास्त्रीय संगीत प्रसार आणि प्रचारासाठी संगीता कुलकर्णी तर युवा
पुरस्कार रुपाली काळे यांना प्रदान करण्यात आला. (Pune News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ब्राह्मण युनिटीच्या सदस्यांनी लिहिलेले आणि डिझाईन केलेले सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. ब्राह्मण युनिटी परिवाराचे एक ज्येष्ठ सदस्य कै शरद गोगटे (काका) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संगीत क्षेत्रात धडपडणाऱ्या नवोदित आणि युवा कलाकाराला त्यांच्या नावाने पुरस्कार द्यावा ही कल्पना पुढे आली आणि या कल्पनेला मागील ३ वर्षापासून मूर्त स्वरूप देण्याचं काम ब्राह्मण युनिटी च्या माध्यमातून सुरू करण्यात आलं. कै शरद गोगटे पुरस्कार सोहळा साजरा होत असतानाच काकांच्या शिकवणीनुसार वर्षभर सदस्यांचे गाण्याचे कार्यक्रम ही देखील एक पर्वणी असते. मयूर कॉलनीतील बालशिक्षण शाळेत आयोजित केलेल्या या कार्यक्रमात वर्ष २०२२ हे वर्ष संगीतोत्सव वर्ष म्हणून जाहीर केलं होतं, त्याचा भाग म्हणून वर्षभर सांगीतिक मेजवानीचा आनंद रसिकांनी अनुभवला.

 

सुरभी, साज-आवाज, साद, हिटस् ऑफ आर. डि ॲंड एस. डि. बर्मन, मनचाहे गीत, गुंजारव या वेगवेगळ्या teams च्या mentors नी जवळपास ८०/९० कलाकारांच्या साथीने कधी लाईव्ह, कधी कराओके, कधी instrumental अशा वेगवेगळ्या संकल्पना ना अतिशय उत्तम सुगम आणि शास्त्रीय गाणी सादर करून रसिकांची मन जिंकली. बालशिक्षण auditorium खचाखच भरलेले ..आणि या रंगतदार संगीत रजनीची दमदार सुरुवात वादिया तेरा दामन…ह्या गाण्याने झाली..एका मागे एक सरस गाण्याचं सादरीकरण होत होत. अगदी थाडे राहियो.. माई री. पिया तू…बाबूजी धीरे ..कही करती होगी…रहे ना रहे… दिलबर दिलं से प्यारे…लाखो है…. ओ हांसिनी…जवनिया ये मस्त…पासून…अगदी आत्ताच्या गजब का है दिन…पर्यंतच्या गाण्यांनी वातावरण अगदी मस्त संगीतमय होऊन गेलं होत. मुळातच मजरूह ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी मजरूह ह्यांच्या कालखंडचा विचार केला तशीच गाण्याची निवड केल्याने कार्यक्रम उतरोत्तर रंगत गेला. (Pune News)

 

कै शरद गोगटे पुरस्काराचे पहिले वर्ष २०१९ मध्ये त्याचे सन्मानार्थी ठरले होते.
विद्यानंद देशपांडे “संगीत मातब्बरांना साथ संगत करणारे आणि संगीत नाटकासाठी साथ करणारे तबला वादक”
व युवा पुरस्कार साठी श्रेया जोशी ही “विदुषी आरती अंकलीकरांची शिष्या उगवता तारा”.. हीचा सन्मान केला गेला.
वर्ष २०२० मध्ये अरविंद फाटक,”सर्वांगिण संगीत कौशल्य” , तर युवा पुरस्कार साठी तरुण सिंथेसायझर वादक
भारत ढोरे असा दोघांचा सन्मान करण्यात आला. वर्ष २०२१ साठी सरिता लिमये-“लोककला संगीत प्रावीण्य”
व युवा तालवादक अमेय एकबोटे ह्यांचा सन्मान केला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune News | Sangeeta Kulkarni and Rupali Kale awarded for classical music propagation and promotion

 

हे देखील वाचा :

Pune Crime | टिंडर अ‍ॅपवर झाली ओळख, बलात्कार करुन उकळली खंडणी; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Washim ACB Trap | 30 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pandharpur Accident | पंढरपुर भीषण अपघात : ट्रॅक्टर उजनी कालव्यात कोसळून 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू, मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश

SSC HSC Exams | दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणांसाठी आता 50 ऐवजी 25 रुपये शुल्क

 

Related Posts