IMPIMP

Pune Crime | टिंडर अ‍ॅपवर झाली ओळख, बलात्कार करुन उकळली खंडणी; पुण्यातील धक्कादायक प्रकार

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime | A woman was molested by making obscene comments, and her husband was brutally beaten when he asked for a jab; Incidents in Dehu Road area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | टिंडर या डेटिंग अ‍ॅपवर (Tinder Dating App) ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून युवतीवर बलात्कार (Rape In Pune) केला. यानंतर शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून खंडणी (Extortion Case) उकळल्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime) पुण्यात उघडकीस आला आहे. हा प्रकार 2018 ते डिसेंबर 2022 या कालावधीत घडला आहे.

 

पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश सक्सेना Akash Saxena (वय-38 रा. रोहन मिथिला, हाऊस नं.19, विमाननगर) याच्यावर आयपीसी 376, 377, 383, 417, 420, 506, 504, 500 अन्वये गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत 37 वर्षीय युवतीने मंगळवारी (दि.13) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांची 2018 मध्ये टिंडर या डेटिंग अ‍ॅपच्या
माध्यमातून ओळख झाली.
त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध (Physical Relationship)
ठेवले. तसेच फिर्यादी यांच्या इच्छेविरुद्ध तिच्या सोबत अनैसर्गिक संबंधही ठेवले.
आरोपीने फिर्यादी यांच्या नावावर विविध बँकांमधून कर्ज काढले.
शारीरिक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन चार लाख रुपये खंडणी मागितली.
फिर्यादी यांनी घाबरून त्याला 50 हजार रुपये दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | a young woman was raped by an acquaintance on tinder and the video was threatened to go viral

 

हे देखील वाचा :

Washim ACB Trap | 30 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pandharpur Accident | पंढरपुर भीषण अपघात : ट्रॅक्टर उजनी कालव्यात कोसळून 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू, मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश

Indian Railway Job Recruitment | बारावी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वेत नोकरीची संधी; जाणून घ्या सविस्तर

SSC HSC Exams | दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणांसाठी आता 50 ऐवजी 25 रुपये शुल्क

 

Related Posts