IMPIMP

Pune News | पुण्यातील हडपसरमध्ये अतिक्रमणांवर पाटबंधारे विभाग व पालिकेची धडक कारवाई; 300 झोपड्या जमीनदोस्त

by nagesh
Pune News | three hundred huts destroyed hadapsar pune municipal corporation action and Department of Irrigation

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | हडपसर (Hadapsar) येथील औद्योगिक वसाहती मागील मुठा कालव्यानजदीक असणाऱ्या दोन्ही भागात अतिक्रमण कारवाई (Slum encroachment action) करण्यात आली आहे. या दिवसभराच्या कारवाईत जवळपास 300 घरे पाडण्यात आले आहे. ही कारवाई पाटबंधारे विभाग (Department of Irrigation) आणि महापालिकेकडून (Pune News) संयुक्तपणे करण्यात आली आहे.

 

हडपसर परिसरात मोठ्याप्रमाणात पाटबंधारे विभागाची जमीन आहे. त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झालेली आहेत. ती काढण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला आहे. त्यानुसार कारवाई सुरू झाली आहे. आगामी काळात टप्याटप्याने सर्व अतिक्रमणे काढून जागा मोकळ्या करण्यात येणार आहेत. या ठिकाणी पाटबंधारे विभागाच्या मोठ्या मोकळ्या जागेवर ही अतिक्रमणे झालेली होती. 4 वर्षांपूर्वी केलेल्या एका कारवाईत अतिक्रमणे काढली गेली होता. त्यानंतर औद्योगिक वसाहतीच्या मागच्या भागात पुन्हा नव्याने अतिक्रमणे झाली होती. त्यावर दीड महिन्यापुर्वी कारवाई करण्यात आली होती. पंरतु, पुन्हा नव्याने 50 ते 60 पत्र्याची शेड ठोकून अतिक्रमणे करण्यात आली (Pune News) होती.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

दरम्यान, येथील सुमारे तीनशे झोपड्या जमीनदोस्त करण्यात आले आहे.
अतिक्रमणे बाजुला केले असता लगेचच त्या ठिकाणी तारेचे कुंपन ओढण्याचे काम सुरू करण्यात आले.
याशिवाय सुरक्षारक्षक देखील तेथे ठेवण्यात आले आहे.
तसेच, या कारवाईत पाटबंधारे विभाग, महापालिका आणि पोलीस असे सुमारे 400 कर्मचारी सहभागी झाले होते.
5 जेसीबीसह 10 डंपरद्वारे ही कारवाई (Pune News) झाली.

 

Web Title :- Pune News | three hundred huts destroyed hadapsar pune municipal corporation action and Department of Irrigation

 

हे देखील वाचा :

Pimpri Accident | दुर्देवी ! फुगेवाडीमध्ये भीषण अपघातात 6 वर्षीय मुलीचा मृत्यू

Chandrakant Patil | ‘मला आमदारकी नितीन गडकरींमुळे मिळाली, सरकार असताना जे मिळालं ते अमित शाहांमुळं’

MLA Gopichand Padalkar | एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक; आटपाडी डेपोला लावलं कुलुप

 

Related Posts