IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | चाकण : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने पेट्रोल ओतून घेऊन केली आत्महत्या

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime News | Chakan: Fed up with his wife's troubles, the husband committed suicide by pouring petrol

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नी सतत कर्ज घेऊन ते फेडायला लावून वर पोलिसांकडे छळाची
तक्रार दिल्याने झालेल्या त्रासातून पतीने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune
Pimpri Chinchwad Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नितीन सुंदर जाधव Nitin Sundar Jadhav (रा. चिखली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुंदर लाडु जाधव Sundar Ladu Jadhav (वय ६६, रा. चिंचवड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३५२/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याची पत्नी, प्रताप नारायण चव्हाण (Pratap Narayan Chavan), रवींद्र नंदलाल सितकल (Ravindra Nandlal Sitkal), (सर्व रा. संतोषनगर, वाकी बुद्रुक, ता. खेड) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा नितीन यांचे ८ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, नितीनची पत्नी कधीही सासरी चिंचवडला आली नाही. नितीनच अधुनमधून वाकी येथे जात असे. ती नेहमी नितीनचे नावाने कर्ज काढायची. ते नितीनला फेडायला लागायचे. तिचे कोणत्यातरी मुलाशी प्रेमसंबंध (Love Affair) होते, असा नितीनला संशय होता. त्यावरुन ती नितीनशी भांडत होती. त्यामुळे नितीन नेहमी टेन्शनमध्ये असायचा. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

 

नितीनचा ३ एप्रिल रोजी दुपारी फिर्यादी यांना फोन आला व मुलाला शाळेतून आणून घरी सोडण्यास सांगितले. नितीन व त्यांची पत्नी हे खेड शिवापूर येथे गेले होते. तेथे दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा ती रिक्षातून निघून गेली. तिने खेड शिवापूर पोलीस ठाण्यात (Khed Sivapur Police Station) तक्रार दिली होती. पोलिसांनी तीला पाठवून दिले होते. तेथून तो सायंकाळी फिर्यादी यांच्या टपरीवर आला. तेव्हा तो खूप घाबरलेला होता. त्याला त्याची पत्नी, मेहुणी, मेहुणा व साडु हे शिवीगाळ व धमकी देत होते. नितीने पत्नीला या शिव्या ऐकवल्या. तो तेथून रिक्षा घेऊन निघून गेला. वाटेत त्याने कोठूनतरी प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये पेट्रोल घेतले. वाकी येथे त्याच्या सासर्‍याचे घराजवळ जाऊन त्याने कॅनमधील पेट्रोल स्वत:चे अंगावर ओतून पेटवून घेतले.
त्याच्या सासरच्या कडील लोकांनी त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले.
परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यु झाला. चाकण पोलिसांनी अनुसूचित जाती आणि
अनुसूचीत जमाती अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :  Pune Pimpri Chinchwad Crime News | Chakan: Fed up with his wife’s troubles, the husband committed suicide by pouring petrol

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | लोहगाव : दुसर्‍याच्या पतीबरोबर मुंबईला गेलेल्या महिलेची तिघींकडून जेन्टस बेल्टने धुलाई

Pune Crime News | वारजे माळवाडी : 10 डिलिव्हरी बॉयकडून 20 लाखाची फसवणूक; डिलिव्हरी प्लस कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणार्‍या 10 जणांवर गुन्हा

Rapper Ram Mungase Arrest | 50 खोक्यांवर रॅप बनवणाऱ्या राम मुंगसेला अटक, रोहित पवारांचा संताप; म्हणाले – ‘तर हा सरकारचा कबुली जबाबच नाही का?’

 

Related Posts