IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला 15 वर्षे सक्तमुजरी

by nagesh
National Lok Adalat At Manchar (Pune) | Organized National Lok Adalat on May 11 at Manchar in Junnar Ambegaon sub division

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | लग्नाचे आमिष दाखवुन (Lure Of Marriage) अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Pune Minor Girl Rape Case) करणार्‍या खासगी कोचिंग क्लासच्या नराधम शिक्षकाला (Teacher In Coaching Class) 15 वर्षे सक्तमजुरी आणि 50 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा विशेष न्यायाधीश के.के. जहागिरदार (Special Court Judge K.K. Jahagirdar) यांनी ठोठावली आहे. दंडाची रक्कम भरल्यास अपील कालावधी संपल्यानंतर ती रक्कम पिडीतेला देण्यात यावी असे देखील न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

 

गोपाळ किसनराव चव्हाण Gopal Kisanrao Chavan (33) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. सदरील गुन्हा हा डिसेंबर 2017 ते 2018 दरम्यान निगडी परिसरात घडला होता. सदरील प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे (Sr PI Shankar Autade) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उत्कर्षा देशमुख (PSI Utkarsha Deshmukh) यांनी केला आहे.  गोपाळ चव्हाण हा भागिदारीमध्ये खासगी कोचिंग क्लास चालवत होता. त्याच्या क्लासमध्ये शिक्षणासाठी येणार्‍या पिडीत अल्पवयीन मुलीला त्याने लग्नाचे आमिष दाखविले आणि तिच्या इच्छेविरूध्द शारीरिक संबंध (Physical Relation) ठेवले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चव्हाणला अटक केली होती. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. सुचित्रा नरोटे (Adv. Suchitra Narote) यांनी 8 साक्षीदार तपासले. आरोपीने अल्पवयीन विद्यार्थिनीचे आयुष्य उध्दवस्त केले आहे. हा गुन्हा गंभीर असल्याने आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी अ‍ॅड. सुचित्रा नरोटे यांनी केली. न्यायालयाने चव्हाणला 15 वर्षे सक्तमजुरी आणि 50 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

 

 

Web Title :-  Pune Pimpri Chinchwad Crime News | Private coaching class teacher gets 15 years hard labor for raping minor girl for marriage

 

हे देखील वाचा :

SPPU News | वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यास छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार

Police Inspector Death In Accident On Samruddhi Mahamarg | समृध्दी महामार्गावर भीषण अपघात : ट्रकला धडकल्याने पोलिस वाहन चक्काचूर, महिला पोलिस निरीक्षकाचा मृत्यू तर 3 कर्मचार्‍यांसह आरोपी गंभीर जखमी

SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘जागतिक बौद्धिक संपत्ती दिन’ साजरा

Food, Civil Supplies and Consumer Protection Department | रास्तभाव दुकानांच्या माध्यमातून नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देणार – अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण

 

Related Posts