IMPIMP

Police Inspector Death In Accident On Samruddhi Mahamarg | समृध्दी महामार्गावर भीषण अपघात : ट्रकला धडकल्याने पोलिस वाहन चक्काचूर, महिला पोलिस निरीक्षकाचा मृत्यू तर 3 कर्मचार्‍यांसह आरोपी गंभीर जखमी

by nagesh
Police Inspector Death In Accident On Samruddhi Mahamarg | Fatal accident on Samruddhi Highway: Police vehicle crushed after hitting a truck, woman police inspector killed, accused along with 3 employees seriously injured

वर्धा : सरकारसत्ता ऑनलाईन  – Police Inspector Death In Accident On Samruddhi Mahamarg | समृध्दी महामार्गावर अपघाताची मालिका सुरू आहे. परभणी (Parbhani) येथून आरोपीला घेऊन नागपूरकडे (Nagpur) जाणारे पोलिसांचे वाहन (Police Van) ट्रकला मागून धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात महिला पोलिस निरीक्षकाचा (Lady Police Inspector Death) मृत्यू झाला आहे तर 3 पोलिस कर्मचार्‍यांसह आरोपी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना दि. 29 एप्रिल 2023 रोजी समृध्दी महामार्गावरील पांढरकवढा (Pandharkawada) गावाजवळ सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. (Police Inspector Death In Accident On Samruddhi Mahamarg)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अपघातात महिला पोलिस निरीक्षक नेहा चव्हाण (Police Inspector Neha Chavan) यांचा मृत्यू झाला आहे तर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (ASI) सुखविंद्रसिंह, मिठ्ठू जगडा आणि चालक शम्मी कुमार यांच्यासह आरोपी वैद्यनाथ शिंदे हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्यांना सावंगी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याबाबत सावंगी पोलिसांनी माहिती दिली आहे. (Police Inspector Death In Accident On Samruddhi Mahamarg)

 

हरियाणा येथील पंचकुला पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षक नेहा चव्हाण आणि त्यांचे सहकारी एका फसवणुकीच्या गुन्हयातील आरोपी वैद्यनाथ शिंदे याला घेवून बोलेरो पोलिस वाहनाने नागपूरच्या दिशेने जात होत्या. समध्दी महामार्गावरील पांढरकडा गावाच्या परिसरात त्यांचे वाहन ट्रकला पाठीमागुन धडकले आणि भीषण अपघात झाला. त्यामध्ये पोलिस वाहनाचा चक्काचूर झाला. पोलिस निरीक्षक नेहा चव्हाण यांचा अपघातात मृत्यू झाला तर बाकीचे सर्वजण गंभीर जखमी झाले.

 

समृध्दी महामार्गावरील भीषण अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सावंगी पोलिस ठाण्याचे (Sawangi Police Station) पोलिस निरीक्षक धनाजी जळक (PI Dhanaji Jhalak), पोलिस अधिकारी संदीप खरात (Police Officer Sandeep Kharat) आणि त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. जाम महामार्ग पोलिस (Jam Highway Police Chowki) देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या वाहनात एका पिस्टलसह 15 राऊंड आढळून आले असून ते पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Police Inspector Death In Accident On Samruddhi Mahamarg | Fatal accident on Samruddhi Highway: Police vehicle crushed after hitting a truck, woman police inspector killed, accused along with 3 employees seriously injured

 

हे देखील वाचा :

SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘जागतिक बौद्धिक संपत्ती दिन’ साजरा

Food, Civil Supplies and Consumer Protection Department | रास्तभाव दुकानांच्या माध्यमातून नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देणार – अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : वारजे माळवाडी पोलिस स्टेशन – भाजपच्या माजी पदाधिकार्‍याने केली गळफास घेऊन आत्महत्या

 

Related Posts