IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : इंजिनिअरिंगला प्रवेश देण्याच्या बहाण्याने 19 लाखांची फसवणूक

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मुलाला कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगला (Computer Science Engineering) चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश देण्याच्या बहाण्याने 19 लाखांची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीवर पुण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च 2023 ते आजपर्यंत वानवडी येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत सुभाषचंद्र श्रीमुनीलाल शर्मा (वय-44 रा. ग्लावियर लाईन, वानवडी बाजार, पुणे) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून विनोदकुमार शर्मा (रा. काहिरा, बुलंदशहर, उत्तर प्रदेश) व इमेल आयडी धारकावर आयपीसी 420, 406, 34 सह आयटी अॅक्ट 66ड नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा उमेश याला कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगला चांगल्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळवून देतो असे आमिष आरोपी विनोदकुमार याने दाखवले. तसेच अनोळखी ईमेल आयडी धारकाने फिर्यादी यांच्या मुलाची वैयक्तीक पाठवण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांना बँक खात्यात 19 लाख 9 हजार रुपये पाठवण्यास भाग पाडले.

पैसे पाठवल्यानंतर फिर्यादी यांच्या मुलाला अॅडमिशन न देता पैशांचा अपहार केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी तक्रार अर्ज केला होता. या तक्रारीची पडताळणी करुन विनोदकुमार शर्मा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे करीत आहेत.

Related Posts