IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : पोलिस कर्मचार्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime News | Pune Pimpri-Chinchwad Crime News: Policeman committed suicide by hanging himself

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या (Pimpri Chinchwad Police) अंतर्गत असलेल्या भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये (Bhosari MIDC Police Station) कार्यरत असणारे पोलिस अंमलदार विशाल माने (Police Vishal Mane) यांनी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide Of Policemen In Pimpri) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलिस दलामध्ये प्रंचड खळबळ उडाली आहे. दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

विशाल माने यांची गुरूवारी साप्ताहिक सुट्टी होती. ते त्यांच्या काही मित्रांसह बाहेर फिरण्यासाठी गेले होते.
रात्री घरी आपल्यानंतर त्यांनी आई-वडिलांसह बातचीत केली. त्यानंतर ते झोपण्यासाठी बेडरूममध्ये गेले
आणि गळफास घेवून आत्महत्या केली.
आवाज दिल्यानंतर देखील दरवाजा उघडत नसल्याने घरच्यांनी शेजार्‍यांना बोलावून दरवाजा तोडला. त्यावेळी विशाल माने यांनी गळफास घेतल्याचे चित्र समोर दिसले.

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

विशाल माने यांची पत्नी काही दिवसांपुर्वी माहेरी गेली होती.
विशाल यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी आणि मुलं आहेत.
अचानकपणे विशाल माने यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Pimpri Chinchwad Crime News | Pune Pimpri-Chinchwad Crime News: Policeman committed suicide by hanging himself

Related Posts