IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, तरुणावर गुन्हा दाखल; पुण्यातील प्रकार

by sachinsitapure
Minor Girl Rape Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | लग्नाचे आमिष दाखवून पुण्यातील एका तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास स्वत: आत्महत्या करण्याची धमकी (Suicide Threats) पीडित तरुणीला दिली. याप्रकरणी नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) वसमत येथील तरुणावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत हवेली तालुक्यातील चऱ्होली बुद्रुक येथील 25 वर्षीय तरुणीने रविवारी (दि.24) लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन विश्वनाथ कुमराव काळे (वय-30 रा. वसमत जि. नांदेड) याच्यावर आयपीसी 376/2/एन, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विश्वनाथ काळे याने तरुणीसोबत ओळख केली.
तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवले.
त्यानंतर तरुणीला मोशी येथील मित्राच्या घरी, दिघी आणि डेक्कन येथील लॉजवर नेले.
तसेच हैदराबाद येथे नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Pune Rape Case) प्रस्थापित केले.
याबाबत पोलिसात तक्रार केली तर स्वत:च्या जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी तरुणीला दिल्याचे फिर्यादीत नमूद
केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पवार (PSI Pawar) करीत आहेत.

Related Posts