IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, लग्नास नकार देणाऱ्या तरुणाला समर्थ पोलिसांकडून अटक

by sachinsitapure
rape

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे शहरात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून तसेच लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून महिला व तरुणींवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याप्रकरणीच्या तक्रारी वाढल्या आहेत. वडगाव शेरी येथील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले. यातून मुलीने एका मुलाला जन्म दिल्यानंतर आरोपीने लग्नास नकार दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत वडगाव शेरी येथे राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणीने मंगळवारी (दि.23) समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अझरुद्दीन असद सय्यद (वय-35 रा. नागेश्वर मंदिरा शेजारी, पुणे) याच्यावर आयपीसी 376/2/एन, 417 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार सप्टेंबर 2022 ते 18 जानेवारी 2024 दरम्यान पीडित तरुणीच्या घरी आणि आरोपीच्या घरात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
आरोपीने तरुणीच्या घरी आणि स्वत:च्या घरी तरुणीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले.
यातून तरुणीने एका मुलाला जन्म दिला. यानंतर तरुणीने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने
लग्न करण्यास नकार दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.

Related Posts