IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड शहरात बनावट ‘पॅराशूट’ तेलाची विक्री, व्यवसायिकावर गुन्हा

by sachinsitapure
FIR

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पॅराशूट कंपनीच्या (Parachute Company) बनावट तेलाची विक्री केल्याप्रकरणी पिंपरी येथील एका व्यावसायिकावर गुरुवारी (दि.30 नोव्हेंबर) गुन्हा (FIR) दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. अशा प्रकारे बनावट तेलाची विक्री करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी व्यावसायिकावर कॉपीराईट अॅक्ट (Copyright Act) नुसार पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

छिवाराम लादूराम चौधरी (वय-33 रा. गावडे पेट्रोल पंप जवळ, गलांडे इस्टेट, चिंचवड) याच्यावर कॉपीराईट अॅक्ट सन 1956 चे कलम 51, 63, 64 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत निखिल दिनकर पाटील (वय-32 रा. शाहूमिल कॉलनी, उचगाव, कोल्हापूर) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चौधरी याला सीआरपीसी कलम 41(1) प्रमाणे नोटीस बजावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व्यावसायिक चौधरी याचे मेन बाझार येथे महालक्ष्मी ट्रेडर्स नावाचे दुकान आहे.
तर फिर्यादी हे पॅराशूट कंपनीत नोकरी करतात. पिंपरी चिंचवड शहरामध्ये पॅराशूट तेलाच्या नावाखाली बनावट तेल
विकत असल्याची माहिती कंपनीला मिळाली होती. त्यानुसार कंपनीने शहरातील काही दुकानदारांकडे तपासणी केली.
यामध्ये आरोपी छिवाराम चौधरी पॅराशूट तेलाचे बनावट उत्पादन दुकानात ठेवून विक्री करताना आढळून आला.

फिर्यादी यांनी याबाबत पिंपरी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी आरोपीच्या दुकानातून 14 हजार 590 रुपये किंमच्या 250,
175 व 100 एमएल च्या एकूण 238 नग बनावट बॉटल जप्त केल्या आहेत. आरोपीने स्वत:च्या आर्थिक
फायद्यासाठी फिर्यादी यांच्या कंपनीचे स्वामीत्व असलेल्या पॅराशटू तेलाचा बनावट माल दुकानात ठेवून त्याची विक्री
करुन कंपनीची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावर्डे (PSI Sawarde) करीत आहेत.

Related Posts