IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | थर्टी फस्टची पार्टी जीवावर बेतली, मावळ तालुक्यात नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

by sachinsitapure
Death by Drowning

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या (New Year) स्वागतासाठी रविवारी (दि. 31 डिसेंबर) सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. मात्र, याला गालबोट लावणारी घटना पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात घडली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळी येत असतात. मात्र, थर्टी फर्स्ट (Thirty First) आणि नवीन वर्षाच्या स्वागताची पार्टी करण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा इंद्रायणी नदीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू (Death by Drowning) झाला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

मयूर भाटी Mayur Bhati (वय-30 रा. वराळे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना वराळे गावच्या हद्दीतील इंद्रायणी नदी (Indrayani River) पात्रात घडली. याप्रकरणी पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे. मयूर त्याच्या मित्रांसोबत वरळे येथे थर्टी फर्स्टची पार्टी करण्यासाठी इंद्रायणी नदी काठी गेला होता. पोहण्यासाठी मयूर पाण्यात उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वन्य जीव रक्षक मावळ संस्थेच्या (Wildlife Conservation Organization Maval) सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

वन्य जीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी काही वेळात मयूरचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.
मयूरच्या अचानक जाण्याने कुटुंबावर आणि त्याच्या मित्रांवरांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
त्यामुळे फिरायला जाताना अथवा पार्टी करण्यासाठी नदी काठी जाणी टाळावे. गेल्यास पाण्यात उतरण्याचे धाडस करु नये,
अन्यथा हेच धाडस जीवावर बेतू शकते. असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related Posts