IMPIMP

Pune Pimpri Crime | पिंपरी चिंचवडमध्ये खरेदी खत करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची 1.85 कोटींची फसवणूक

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Warje Police Station - 86 Lakh fraudster arrested by offering attractive returns

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Pimpri Crime | विकत घेतलेल्या फ्लॅटचे खरेदी खत नसल्याने ते करुन देण्याच्या बहाण्याने फ्लॅटवर बँकेचे कर्ज (Bank Loan) काढून एका ज्येष्ठ नागरिकासह त्यांच्या मुलाची 1 कोटी 85 लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.19) तीन जणांवर IPC 406, 420, 120 (ब), 34 अन्वये गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Pimpri Crime) आला आहे.

 

याबाबत लखमशी कांजीभाई पटेल Lakhamshi Kanjibhai Patel (वय – 73 रा. दत्त मंदिर रोड, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका महिलेसह चैतन्य कालबाग Chaitanya Kalbagh (वय – 60 रा. तारपाडा रोड, अंबोली, अंधेरी (प), मुंबई), दीपक शिवचरण प्रजापति Deepak Shivcharan Prajapati (वय – 46 रा. ओशिवरा, मुंबई) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2017 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत वाकड येथे घडला आहे. (Pune Pimpri Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या मुलाचा विस्टा इम्प्रेस, वाकड (Vista Impress, Wakad) येथे फ्लॅट होता.
या फ्लॅटचे खरेदीखत फिर्यादी यांच्या नावावर नव्हते.
त्यामुळे आरोपींनी फसवणूक करण्याचा कट रचून फिर्यादी यांचा मुलगा विपुल याच्याकडून खरेदीखत करुन घेतले.
आरोपींनी फ्लॅट आयसीआयसीआय बँकेकडे (ICICI Bank) गहाण ठेवून दोन कोटी रुपयांचे कर्ज घेऊन फ्लॅटवर बेकायदेशीरपणे बोजा चढवला.
आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मुलाची 1 कोटी 85 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जे. एस. गिरनार (PSI J. S. Girnar) करत आहेत.

 

Web Title : –  Pune Pimpri Crime | 1.85 crore fraud of a senior citizen on the pretext of buying fertilizer in Pimpri Chinchwad

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | ‘माझं शरीर अमजद खानसारखं… कितने आदमी थे…65 में से 50 निकल गए और सब कुछ बदल गया’, देवेंद्र फडणवीसांनी उडवली ठाकरेंची खिल्ली (व्हिडिओ)

Deepak Kesarkar | ‘महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही मुलगा आणि वडील मंत्री झाले नाहीत’, दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

Pune Crime | शालेय मुलीच्या लैंगिक शोषणाची प्रशासनाकडून गंभीर दखल, ‘तो’ नराधम शिक्षक निलंबित

 

Related Posts