IMPIMP

Deepak Kesarkar | ‘महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही मुलगा आणि वडील मंत्री झाले नाहीत’, दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

by nagesh
Uddhav Thackeray | uddhav thackeray blunt questions directly to deepak kesarkar in nagpur winter session

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन बाळासाहेबांची इच्छा नसणाऱ्या लोकांसोबत सत्ता बनवली. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही मुलगा आणि वडील मंत्री झाले नाहीत. ते यांनी घडवलं, त्यांना लोकशाहीची परंपरा तोडावी लागली असा टोला दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना नाव न घेता लगावला. तसेच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत. गोबेल्सची नीती वापरत आहेत. महाराष्ट्रात गोबेल्स तयार होऊ नये, असंही दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अमित शहांच्या (Amit Shah) चर्चेचा हवाला देता तर मोदी यांच्यासोबत काय चर्चा झाली ते सांगा. भाजपशी (BJP) चर्चा न करता राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) सोबत सरकार बनवलं गेलं. जनतेला दिलेला शब्द यांनी मोडला, असंही दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले,

 

महापालिका निवडणुकीत युती करणार

आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत (Brihanmumbai Municipal Corporation Election) भाजप आणि शिंदे गट (Shinde Group) महापालिकेतही युती करणार आहे. दोघंही मिळून 150 पेक्षा जास्त जागा निवडून आणू. आमची युती आता कायम राहणार आहे. आमच्या स्वार्थासाठी आम्ही कधीही युती तोडणार नाही. असे सांगताना दीपक केसरकर म्हणाले, महापालिकेत भाजपची सत्ता 2017 मध्ये आली असती. परंतु देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे यांचा मान ठेवून काही केलं नाही, असा दावा त्यांनी केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

आमचा प्रत्येक प्रवक्ता उत्तर देणार

दीपक केसरकर म्हणाले, हे आमच्या बद्दल सर्वत्र काहीही बोलत आहेत.
पण आता आमचा प्रत्येक प्रवक्ता यांना उत्तर देईल. कारण आम्ही बोललो नाही तर लोकांना त्यांचं खरं वाटायचं.
म्हणून आता आम्ही या सर्वांबद्दल बोलू, पण आम्हाला त्यांच्याबद्दल घाणेरडं बोलायचं नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title : –  Deepak Kesarkar | maharashtra minister deepak kesarkar on shiv sena uddhav thackeray aaditya thackeray maharashtra political crisis

 

हे देखील वाचा :

Rain in Maharashtra | राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ भागात धुवाँधार पाऊस

Pune Crime | शालेय मुलीच्या लैंगिक शोषणाची प्रशासनाकडून गंभीर दखल, ‘तो’ नराधम शिक्षक निलंबित

Eknath Khadse | एकनाथ खडसेंना मोठा धक्का ! जिल्हा दुध संघाने अतिरिक्त खर्च केल्याचा ठपका, संचालकमंडळावर कारवाई करण्याचे आदेश; मंदाकिनी खडसेंच्या अडचणीत वाढ

 

Related Posts