IMPIMP

Pune Pimpri Crime | दारुचा ग्लास सांडला म्हणून मित्राचा खून, मृतदेह फेकला कचऱ्यात; हिंजवडी पोलिसांकडून दोघांना अटक

by nagesh
Pune Pimpri Crime | murdered by spilling a glass of liquor body thrown in garbage heap

पिंपरी :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Pimpri Crime | एकत्र दारु (Liquor) पीत असताना एकाकडून दारुचा ग्लास सांडला. यामुळे त्याला काठीने व दारूच्या बाटलीने तोंडावर व डोक्यावर मारुन खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये समोर (Pune Pimpri Crime) आली आहे. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह कचऱ्याच्या (Garbage) गाडीत टाकून महाळुंगे गावाजवळ रस्त्याच्या बाजूला टाकला. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police Station) दोघांना अटक केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नीलेश सतीश धुमाळ (Nilesh Satish Dhuma), राजेंद्र थोरात (Rajendra Thorat) अशी अटक (Arrest) केलेल्यांची नावे आहेत. मयताची पूर्ण ओळख अद्याप पटलेली नाही. त्याचे नाव बालाजी असून तो नांदेड येथील असल्याचे तपासातून समोर आले आहे. मयत बालाजी हा पिंपरी-चिंचवड परिसरात फिरस्ता होता. (Pune Pimpri Crime)

मृत बालाजी, निलेश आणि राजेंद्र हे देशी दारुच्या दुकानामागे मद्यपान करत होते. नीलेश आणि बालाजी मद्यपान करत असताना बालाजीने दारुचा ग्लास सांडला. याचा निलेशला राग आला. त्याने बालाजीला काठीने आणि दारुच्या बाटलीने बेदम मारहाण (Beating) केली. यामध्ये बालाजीचा जागीच मृत्यू झाला.

15 जुलै रोजी सायंकाळी माण-म्हाळुंगे येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या डस्टबिनमध्ये एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. त्याची ओळख पटली नाही. शवविच्छेदन अहवालात त्याच्या डोक्यावर वार करुन खून केल्याचे निष्पन्न झाले होते. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली होती.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन कचरा टाकणाऱ्या गाडीची ओळख पटवून पोलिसांनी चालक राजेंद्र याला अटक केली. कंट्रीबार येथे काम करणारे अखिल आणि धर्मेंद्र या दोघांनी कचऱ्यासोबत बालाजीचा मृतदेह गाडीत भरला असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन पुरावा नष्ट केल्याची कलमवाढ करण्यात आली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (CP Ankush Shinde), अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे (Addl CP Dr. Sanjay Shinde),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 आनंद भोईटे (DCP Anand Bhoite), सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले (ACP Srikanth Disley)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर (Senior Police Inspector Dr. Vivek Muglikar),
पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल दहिफळे (Police Inspector Sunil Dahifale),
सोन्याबापू देशमुख (Police Inspector Sonyabapu Deshmukh), सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे (API Sagar Kate),
गोमारे (API Gomare), सहायक पोलीस उपनिरीक्षक बंडु मारणे, पोलीस अंमलदार बाळकृष्ण शिंदे, कैलास केंगले,
रितेश कोळी, अरुण नरळे, चंद्रकांत गडदे, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे,
अमर राणे, दत्ता शिंदे, सुभाष गुरव यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Pimpri Crime | murdered by spilling a glass of liquor body thrown in garbage heap

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणारा गुन्हे शाखेकडून गजाआड

Maharashtra Politics | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रकृती बिघडली, तर उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना; शहा, नड्डा यांची भेट घेण्याची शक्यता

Shivsena MP Sanjay Raut | शिवसेना खासदार संजय राऊतांचा ईडी कोठडीतला मुक्काम वाढला

Related Posts