IMPIMP

Pune PMC News | महापालिकेच्या जागा वाटप नियमावलीत ‘मोठा’ बदल ! संयुक्त प्रकल्पाच्या नावाखाली 1500 चौ. फुटांपर्यंतच्या वास्तु वाटपांच्या खैरातीला लावला ‘ब्रेक’

by nagesh
Pune PMC News | Pune Municipal Administration has made the process of TDR even easier from today; Stage no. 2 to the Commissioner and the powers of the Standing Committee to the Additional Commissioner

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune PMC News | पुणे महापालिकेच्यावतीने Pune Municipal Corporation (PMC) नागरी सुविधांसाठी उभारण्यात येणार्‍या मिळकतींच्या वाटप नियमावलीमध्ये प्रशासनाने (PMC Administration) सुधारणा केली आहे. बहुद्देशीय भवन सारख्या दीड हजार चौरस फूटांपेक्षा मोठ्या वास्तु देखिल एकच युनिट मानून जागा वाटप नियमावलीनुसारच त्या वापरासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे क्षेत्रिय कार्यालय स्तरावर दीड हजार चौरस फूटांपर्यंतच्या समाज मंदिर, व्यायामशाळा आणि विंरगुळा केंद्रासारख्या वास्तू वाटप थेट आयुक्तांच्या नियंत्रणाखाली आले असून या वास्तुंच्या ‘खैरातींना’ ब्रेक लागणार आहे. (Pune PMC News)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

महापालिकेच्यावतीने नागरी सुविधांसाठी समाज मंदिर, व्यायामशाळा, विरंगुळा उभारण्यात येतात. या वास्तूंचे क्षेत्रफळ साधारण दीड हजार चौरस फुटांपर्यंत असते. या वास्तू वापराबाबत २००८ मध्ये करण्यात आलेल्या जागा वाटप नियमावलीचा आधार घेण्यात येतो. या वास्तूंचा वापर पूर्णत: अव्यावसायीक व समाजोपयोगी कारणांसाठी होणार असेल तर अशा प्रकारच्या वास्तूंचा विनियोग संबधित प्रभागात काम करणार्‍या सामाजिक संस्थांकडून केला जाणे अपेक्षित आहेत. यासाठी जाहिर निविदा काढून सामाजिक योगदान, अनुभव, कार्यक्षमता, जास्तीत जास्त मोबदला देणारी संस्था इ. निकषांवर सर्वात योग्य ठरणार्‍या संस्थेस महापालिका ठरवेल त्या अटीशर्तींनुसार देण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आलेले आहेत. (Pune PMC News)

 

परंतू २०११ मध्ये प्रशासनाने परिपत्रक काढून दीड हजार चौ. फूटांपर्यंतच्या वास्तू वापरास देण्याचे आयुक्तांच्या अधिकारांचे क्षेत्रिय कार्यालय स्तरावर विकेंद्रीत करण्यात आले होते. तेंव्हा पासून संयुक्त सामाजिक प्रकल्पाअंतर्गत अशा छोट्या वास्तूंचे वाटप करण्यात येत आहे. महापालिकेच्या मालमत्ता विभागाने काही महिन्यांपुर्वी महापालिकेच्या मालमत्तांचे सर्वेक्षण करून ऑडीट केल्यानंतर अनेक मिळकतींचा विना करार वापर सुरु असल्याचे निदर्शनास आले. तसेच अनेक वास्तूंचे करार संपल्यानंतरही त्या वास्तू संबधित संस्थांच्याच ताब्यात असून त्यांचा सामाजिक ऐवजी व्यक्तिगत वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने महापालिकेच्या वास्तूंचे रक्षण करण्यासाठी आणि सुसूत्रता आणण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. यापुढील काळात महापालिकेच्या संबधित विभागाला वास्तुची आवश्यक्ता असली तरच त्यांच्याकडून ना हरकत पत्र, आर्थिक तरतुद व भविष्यातील खर्चासाठीची तरतूद उपलब्ध करून देण्याचे हमीपत्र घेतल्यानंतरच वास्तु उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे (Ravindra Binwade PMC) यांनी दिले आहेत. तर आज त्यापुढे एक पाउल टाकत संयुक्त प्रकल्पाअंतर्गत जागा वाटपासंदर्भातील २०११ मधील परिपत्रक रद्द केले आहे.

यापुढील काळात दीड हजार चौरस फुटांपर्यंत बांधकाम केलेल्या व्यायामशाळा, अभ्यासिका, समाज मंदिर व तत्सम इमारत ज्या प्रभागात अथवा वॉर्डात असेल त्यामधील साामजिक काम करणार्‍या नोंदणीकृत संस्थेकडून अर्ज स्विकारून अशा संस्थांना व्यवस्थापन व देखभालीसाठी स्थायी समिती व मुख्य सभेच्या मान्यतेनेच देता येतील. यसाठी संपुर्ण बांधकामाचे क्षेत्र हे दीड हजार चौरस फुटापर्यंत ग्राह्य धरण्यात येईल. एकाच इमारतीमध्ये एकूण बांधीव क्षेत्र हे दीड हजार चौरस फुटांपेक्षा अधिक असेल वा त्याचे टप्प्याटप्प्याने बांधकाम प्रस्तावित असेल तरी ती संपुर्ण इमारत एकच युनिट समजून त्याचा विनियोग करण्यात यावा. एकाच इमारतीत दीड हजार चौ. फुटाचे स्वतंत्र युनिट वा स्वतंत्र मजला गृहीत धरून क्षेत्रिय कार्यालयाच्या स्तरावर त्याचा विनियोग करण्यात येउ नये, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

बहुद्देशीर भवन येणार अडचणीत

शहरामध्ये अनेक नगरसेवकांनी ‘स’ यादीतून आपल्या प्रभागात विविध सुविधा एकाच छताखाली देण्यासाठी
बहुद्देशीय भवनच्या नावाखाली मोठ्या वास्तू उभारल्या आहेत. प्रशासनाच्या जागा वाटपाच्या
नव्या आदेशानुसार या भवनमध्ये संयुक्त प्रकल्प म्हणून वेगवेगळ्या संस्थांना जागा वाटप करणे जिकिरीचे होणार आहे.
यामुळे चांगले काम करणार्‍या छोट्या सामाजिक संस्थांची मोठी अडचण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 

Web Title :- Pune PMC News | Big change in Pune Municipal Corporation’s (PMC) allotment rules! 1500 sq.ft. under the name of joint project

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ‘रात्री कोण कुठं फिरतंय, गार्डनमध्ये गुलूगुलू करतंय, आता मला सगळं कळणार’ – अजित पवार

Pune Crime | तरुणीकडून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी, विवाहित तरुणाची आत्महत्या; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Maharashtra Police Crime News | धक्कादायक ! पोलिसानेच केला सहकारी महिलेवर बलात्कार, पोलीस दलात खळबळ

 

Related Posts