IMPIMP

Pune PMC News | पुणे महानगरपालिकेच्या सीमांमध्ये फेरफार ! मनपाच्या हद्दीतून फुरसुंगी आणि उरूळी देवाची ‘हद्दपार’, शासनाने जाहिर केली पुणे मनपाची सुधारित हद्द

पुणे महापालिकेत समाविष्ट केलेल्या फुरसुंगी आणि उरूळी देवाची या गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याबाबतचा शासकीय अध्यादेश अखेर सरकारने काढला

by nagesh
Pune PMC News | Changes in the boundaries of the Pune Municipal Corporation! 'Expulsion' of Fursungi and Uruli Deva from the municipality limits, the government announced the revised limits of Pune municipality

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC News | पुणे महानगरपालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) हद्दीतून फुरसुंगी (Fursungi) आणि उरूळी देवाची (Uruli Devachi) या गावांना वगळण्यात आले आहे. त्याबाबतचे आदेश राज्य शासनाचे उप सचिव अनिरूध्द व्यं. जेवळीकर यांनी आज काढले आहेत. (Pune PMC News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुणे महानगरपालिका हद्दीतून वगळावयाचे क्षेत्र –

फुरसुंगी – स.नं. 193, 192 पै, 194, 195 पै, (कचरा डेपो) चे क्षेत्र वगळून गावठाणासह संपुर्णमहसुली गावाचे क्षेत्र

उरूळी देवाची – स.नं. 30,31 व 32 पै, (कचरा डेपो) चे क्षेत्र वगळून गावठाणासह संपुर्ण महसुली गावाचे क्षेत्र

पुणे महानगरपालिकेची सुधारित हद्द (Pune PMC News)

उत्तर – कळस, धानोरी व लोहगाव या महसुल गांवाची हद्द

उत्तर पुर्व – लोहगाव, वाघोली या महसुल गावांची हद्द

पूर्व – मांजरी बु., शेवाळेवाडी, हडपसर या महसूली गावांची हद्द व फुरसुंगी महसुली गावातील कचरा डोपोची हद्द

दक्षिण पुर्व – महंमदवाडी, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी या महसूली गावांची हद्द व उरूळी देवाची महसुली गावातील कचरा डेपोची हद्द

दक्षिण – धायरी, वडाचीवाडी, येवलेवाडी, कोळेवाडी, भिलारेवाडी या महसूली गावांची हद्द

दक्षिण-पश्चिम – पश्चिमेस नांदेड, खडकवासला, नांदोशी सणसनगर, कोपरे या महसूली गावांची हद्द

पश्चिम – कोंढवे धाडवे, बावधन बु. व खुर्द, म्हाळुंगे, सुस या महसुली गावांची हद्द

पश्चिम-उत्तर – बाणेर, बालेवाडी या महसूली गावांची हद्द व पुणे महानगरपालिकेची जुनी हद्द

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना 2017 मध्ये 11 गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये देवाची उरुळी आणि फुरसुंगी या गावांचा समावेश होता. परंतु नुकतेच राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ही दोन गावे वगळण्याचा निर्णय घेतला. महापालिका कुठल्याही सुविधा देत नाही. त्यातुलनेत मिळकत कर प्रचंड प्रमाणात आकारला जात असल्याने ही गावे वगळण्याची मागणी विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला.

 

फुरसुंगी आणि उरूळी देवाची या गावांची स्वतंत्र नगरपालिका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फुरसुंगी आणि उरूळी देवाची गावे पालिकेतून वगळावीत व त्यांची स्वतंत्र नगरपालिका करावी, अशी मागणी काही ग्रामस्थांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडे (Shinde Fadnavis Govt) केली. माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मान्यता दिली.

 

 

मात्र, शासनाने तसा निर्णय न घेता महापालिकेने कचरा डेपोची जागा वगळता ही गावे वगळण्याबाबत ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवावा, अशी सूचना केली गेली. त्यानुसार पालिकेने (Pune PMC) ठराव करून पाठवला. त्यानंतरही शासनाकडून आदेश काढण्यात आलेला नव्हता. अखेर आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी (March End) शासनाने (Maharashtra State Govt) ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळून त्यांची नगरपालिका करण्याचा आदेश जारी केला आहे.

 

Web Title :  Pune PMC News | Changes in the boundaries of the Pune Municipal Corporation! ‘Expulsion’ of Fursungi and Uruli Deva from the municipality limits, the government announced the revised limits of Pune municipality

 

 

हे देखील वाचा :

MP Imtiaz Jalil | गिरीश महाजनांच्या आरोपांवर इम्तियाज जलील भडकले, म्हणाले-‘मला वाटायचं गिरीश महाजनांना थोडी अक्कल…’

Girish Mahajan | संभाजीनगरमधील मविआच्या सभेला परवानगी मिळणार?, गिरीश महाजानांचे मोठे वक्तव्य

Pune Crime News | पुणे : दोन दिवसांच्या अंतराने उच्चशिक्षित नवविवाहित दाम्पत्याची आत्महत्या

 

Related Posts