IMPIMP

Girish Mahajan | संभाजीनगरमधील मविआच्या सभेला परवानगी मिळणार?, गिरीश महाजानांचे मोठे वक्तव्य

by nagesh
Girish Mahajan | chhatrapati sambhajinagar mahavikas aghadi bjp girish mahajan maharashtra politics

छत्रपती संभाजीनगर : सरकारसत्ता ऑनलाईन –  छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या आदल्या दिवशी दोन गटात वाद (Chhatrapati Sambhaji Nagar Incident) निर्माण झाले होते. यावेळी अनेक वाहनांवर दगडफेक करुन जाळपोळीची घटना घडली होती. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) रविवारी (दि.2 एप्रिल) सभा होणार आहे. शहरात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या सभेला परवानगी मिळणार का? असा प्रश्न उद्भवला आहे. यावर गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मोठं विधान केलं आहे. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

छत्रपती संभाजीनगरमधल्या किराडपुरा मध्ये समाजकंटकांनी गाड्यांची तोडफोड करत जाळपोळही केली. त्यामुळे आता सभेला परवानगी मिळणार की नाही, याबाबत गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलेल्या विधानामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते सभा होणार असल्याचे ठामपणे सांगत आहेत.

 

भाजप (BJP) विरोधात महाविकास आघाडीकडून राज्यभरात सभा घेतल्या जाणार आहेत.
यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगर येथे 2 एप्रिल रोजी होणार आहे.
महाविकास आघाडीच्या सभेमुळे वातावरण बिघडत असेल तर सभा थांबवू,
पोलिसांना तसा रिपोर्ट दिल्यास किंवा सभेमुळे काही प्रश्न निर्माण होणार असतील तर प्रशासन परवानगी देणार नाही,
असे महाजन यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानावर विरोधकांच्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

Web Title :-   Girish Mahajan | chhatrapati sambhajinagar mahavikas aghadi bjp girish mahajan maharashtra politics

 

हे देखील वाचा :

Bharatiyam 2023 | ‘भारतीयम २०२३’ला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद ! भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यशस्वी आयोजन

Jitendra Awhad | सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा, छत्रपतींच्या वारसांना अशी वागणूक तर बाकीच्यांचे काय?, संयोगिताराजेंच्या ‘त्या’ पोस्टनंतर जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल

S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी, न्युट्रीलिशियस् संघांचा सलग दुसरा विजय !!

 

Related Posts