IMPIMP

Pune PMC News | नळस्टॉप चौकातील ‘नाईट लाईफ’ अतिक्रमण विभागाकडून बंद; खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर मध्यरात्री केली कारवाई

by nagesh
Pune PMC News | ‘Night Life’ in Nalstop Chowk closed by Encroachment Department; Action taken at midnight on food carts

पुणे :सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC News | कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकामध्ये रात्री १२ वाजल्यानंतर सुरू होणार्‍या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर अखेर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली. याठिकाणी पुन्हा व्यवसाय सुरू करू नये अशी तंबी संबधित व्यावसायीकांना देण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून रात्री बारा वाजल्यानंतर याठिकाणी दहा ते बारा हातगाड्यांवर खाद्य पदार्थांची विक्री होत असून ‘नाईट लाईफ’ च्या नावाखाली मोठ्याप्रमाणावर गर्दी होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने ही कारवाई केली. (Pune PMC News)

 

नळ स्टॉप चौकामध्ये रात्री बारा वाजल्यानंतर चहा पोह्यांसह खाद्यपदार्थ विक्री सुरू झाली होती. सुरूवातीला एक दोन व्यावसायीकांपासून सुरू झालेल्या रात्रीच्या खाद्य अड्डयावर ग्राहकांच्या वाढत्या संख्येसोबतच विक्रेत्यांचीही संख्या वाढत होते. कोथरूडच नव्हे तर शहराच्या अन्य भागातुनही गरजूच नव्हे तर मोठ्याप्रमाणावर युवक, युवती देखिल नाईट लाईफच्या नावाखाली येथे गर्दी करत होते. यातून रात्री उशिरापर्यंत गाड्यांचे आवाज आणि वादावादी सारख्या घटनांमुळे स्थानीक नागरिक त्रासले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रात्री बारा वाजल्यानंतर पहाटेपर्यंत या गाड्या उभ्या केल्या जात असल्यानेही अतिक्रमण विभागावर कारवाईच्या मर्यादा येत होत्या.
अखेर काल कोथरूड क्षेत्रिय कार्यालयाच्या अतिक्रमण पथकाने येथील गाड्या, खुर्च्या आणि टेबल जप्त करून नेल्या.
याठिकाणी पुन्हा व्यवसाय करू नये,
अशी ताकीद देतानाच पुन्हा व्यवसाय सुरू झाल्यास कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल,
असा इशाराही व्यावसायीकांना देण्यात आल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. (Pune PMC News)

 

Web Title : Pune PMC News | ‘Night Life’ in Nalstop Chowk closed by Encroachment Department; Action taken at midnight on food carts

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | वानवडी पोलिसांकडून मोबाईल चोरी करणार्‍या उच्चशिक्षीत तरूणास अटक

Narayan Rane | ‘या एक आमदार वाल्यानं…’, नारायण राणेंचा राज ठाकरेंना टोला (व्हिडिओ)

Aryan Khan Drugs Case | समीर वानखेडेंसह NCB च्या दोन अधिकाऱ्यांचे फोन जप्त, सीबीआय चौकशीची तारीख ठरली

Pune Crime News | विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत दहशत निर्माण करणार्‍या सराईत गुन्हेगारावर MPDA, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची आतापर्यंतची 15 वी कारवाई

 

Related Posts