IMPIMP

Pune PMC News | रस्त्यांच्या नियोजनबद्ध कामांसाठी महापालिका घेणार ‘डिजिटायजेशन’ ची मदत

by nagesh
Pune PMC News | The Municipal Corporation will take the help of 'Digitization' for planned road works Additional commissioner Vikas Dhakne, Pune PMC

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune PMC News | पावसाळ्यातील खड्डेमय रस्त्यांचा अनुभव पाहाता महापालिका (Pune PMC News) अधिक अलर्ट झाली आहे. शहरातील रस्त्यांच्या दुरूस्तीसोबतच पावसाळ्यापुर्वी नियोजनबद्ध कामे व्हावीत यासाठी ‘डिजिटायजेशन’ ची मदत घेणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakne) यांनी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शहरात पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्याप्रमाणावर खड्डे पडतात. पाईपलाईन तसेच अन्य सर्व्हीस लाईन्सच्या कामामुळे वारंवार होणारी खोदाई आणि त्यानंतर केल्या जाणार्‍या दुय्यम दर्जाच्या रस्ते दुरूस्तीमुळे शहरातून वाहन चालविणे अवघड होत आहे. याची गंभीर दखल महापालिका प्रशासनाने घेतली आहे. पावसाळ्यानंतर पालिकेने शहरातील विविध भागातील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे. विशेष असे की जी २० परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने ही कामे युद्ध पातळीवर करून घेतली आहेत. (Pune PMC News)

 

मात्र, यानंतरही शहरातील अनेक भागात चोवीस तास पाणी पुरवठा योजना तसेच विविध सेवा वाहीन्यांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर खोदाईला परवानगी दिली आहे. परंतू ही परवानगी देतानाच सेवावाहीन्या टाकल्यानंतर रस्त्यांची दुरूस्ती वेळेत आणि दर्जेदार होतील यासाठी नियोजन केले आहे.
प्रामुख्याने शहराशी जोडणार्‍या महामार्गांसोबतच गर्दीच्या प्रमुख रस्त्यांवरील पाईपलाईन, इंटरनेट केबल, ड्रेनेज,
पावसाळी गटारे, एमएनजीएल तसेच वीज वाहीन्यांची कामे प्राधान्य क्रमाने विहीत मुदतीत करून घेण्यात येणार आहेत.
त्यानंतरच रस्त्यांची दुरूस्ती व रिसर्फेसिंगची कामे केली जाणार आहेत.
विविध विभागातील कामांचा समन्वय राहावा आणि नागरिकांनाही ही माहिती मिळावी यासाठी खोदाईसह कामांच्या
परवानग्या देखिल ऑनलाईन पाहायला मिळतील यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहे.
लवकरच हे काम पूर्ण करून प्रत्येक काम विहीत मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न राहील,
असा दावा अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी केला आहे.

 

रस्त्यांच्या कामासाठी खोदाई केलेली असताना त्याठिकाणी पादचारी आणि वाहनचालकांसाठी सुरक्षिततेचे उपाय आणि
फलक लावलेले नसल्याचे अनेकदा आढळून आले आहे.
या पार्श्‍वभुमीवर कामांच्या ठिकाणी अधुनिक पद्धतीचे एकसारखे बॅरीकेडस आणि एक सारखे सूचना फलक लावण्यात येणार आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

– विकास ढाकणे, अतिरिक्त महापालिका आयुक्त, पुणे महापालिका.
(Additional commissioner Vikas Dhakne, Pune PMC) 

 

Web Title :- Pune PMC News | The Municipal Corporation will take the help of ‘Digitization’ for planned road works Additional commissioner Vikas Dhakne, Pune PMC

 

हे देखील वाचा :

Maharashtra Police Recruitment | SRPF गट क्र.५ दौंड येथील सशस्त्र पोलीस भरती ! लेखी परीक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध; आक्षेप नोंदवण्यास ३१ जानेवारीपर्यंतची मुदत

Sanjay Shirsat On Sanjay Raut | ‘आजच्या घडीला संजय राऊत राजकारणातील जोकर’ – शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट

Maharashtra Political Crisis | शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून निवडणुक आयोगाकडे लेखी युक्तीवाद सादर; खासदार अनिल देसाईंनी दिली माहिती

 

Related Posts