IMPIMP

Maharashtra Political Crisis | शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून निवडणुक आयोगाकडे लेखी युक्तीवाद सादर; खासदार अनिल देसाईंनी दिली माहिती

by nagesh
Maharashtra Political Crisis | uddhav thackeray group submits written argument to election commission on shivnsena dispute

दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Political Crisis | शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यात येत आहे. याप्रकरणाची सुनावणी निवडणुक आयोगासमोर (ECI) सुरू असून आज याप्रकरणी लेखी युक्तीवाद आयोगाकडे सादर करण्याची सुचना निवडणुक आयोगाकडून दोन्ही गटांना देण्यात आली होती. त्यालाच अनुसरून आज (दि.३०) शिवसेनेच्या ठाकरे गटाने (Shivsena Thackeray Group) निवडणुक आयोगाकडे लेखी युक्तीवाद सादर केला आहे. अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी दिली. निवडणुक आयोगाकडे ई-मेलच्या माध्यमातून युक्तीवाद सादर केल्याची माहिती अनिल देसाई यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. (Maharashtra Political Crisis)

 

यावर बोलताना अनिल देसाई म्हणाले, ‘२१ जूनपासून जो घटनाक्रम घडला, तो सर्व घटनाक्रम आम्ही निवडणूक आयोगाला दिलेल्या लेखी युक्तिवादात स्पष्ट केला आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबरोबरच यापूर्वी निवडणूक आयोगापुढे झालेल्या सुनावणीतील मुद्द्यांचाही समावेश आहे. याचबरोबर शिंदे गटाने (Shivsena Shinde Group) ज्या प्रकारे शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला होता, तो दावा नेमका कसा चुकीचा आहे, हे देखील आम्ही या युक्तिवादात सांगितलं आहे.’ अशी माहिती खासदार अनिल देसाई यांनी यावेळी बोलताना दिली. (Maharashtra Political Crisis)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तसेच यावर पुढे बोलताना अनिल देसाई म्हणाले, ‘आमदार खासदार सोडून गेल्याने पूर्ण पक्ष त्यांचा होत नाही. पक्ष हा पूर्णपणे वेगळा असतो. पक्षाची विचारधारा आणि पक्षाचे नेतृत्व या गोष्टी बघून मतदार मतदान करत असतात. त्यामुळे एखाद्या आमदार-खासदाराने ही जनताच माझी आहे म्हणणं, हा दावाच मुळात चुकीचा आहे. या सर्व गोष्टी आम्ही कायद्याच्या चौकटीत बसवून निवडणूक आयोगापुढे मांडल्या आहेत.’ असं यावेळी बोलताना खासदार अनिल देसाई म्हणाले.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | uddhav thackeray group submits written argument to election commission on shivnsena dispute

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | वरळीत आदित्य ठाकरेंना मोठा धक्का, माजी नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश

Satyajit Tambe | ‘मी अपक्ष उमेदवार आहे, आणि अपक्षचं राहील..’ कुठलंही राजकीय भाष्य आजच्या तारखेला करणार नाही – सत्यजीत तांबे

Chitra Wagh | ‘मी कोणाचीच तुलना केली नाही’, ‘त्या’ वक्तव्यावरुन चित्रा वाघ यांची सारवासारव (व्हिडिओ)

Radhakrishna Vikhe-Patil | ‘घरोबा एकाबरोबर करायचा अन् संसार दुसऱ्याबरोबर करायचा;’ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र

 

Related Posts