IMPIMP

Pune PMC Property Tax | 40 टक्के मिळकत कर सवलत सुरु राहण्यासाठी PT-3 अर्ज भरुन देणे बंधनकारक, अन्यथा…

by nagesh
Pune PMC Property Tax | Filing of PT-3 application is mandatory to continue the 40 percent income tax exemption

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC Property Tax | राज्य शासनाच्या (Maharashtra State Govt) आदेशानुसार पुणे महापालिका Pune Municipal Corporation (PMC) मिळकत करातील 40 टक्के कर सवलत पुर्ववत करण्यात आली आहे. परंतू ही सवलत घेणार्‍या मिळकतधारकांनी 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत स्वत: मिळकत धारकच संबधित मिळकतीत राहत असल्याचा अर्ज (पीटी 3 छापील अर्ज), पुराव्यांसह कर आकारणी व संकलन विभागाकडे सादर करायचा आहे. या अर्जानुसार महापालिकेचे अधिकारी तपासणी करणार असून या अर्जात खोटी माहिती दिल्यास संबधितांना मिळकत करामध्ये कुठल्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Pune PMC Property Tax)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नव्याने बांधकाम झालेल्या निवासी मिळकतींची आकारणी (Pune PMC Property Tax) 40 टक्के सवलत न देता 1 एप्रिल 2019 पासून पुढे झालेली आहे. अशा सर्व मिळकतींना 40 टक्के सवलत जी.आय.एस.सर्व्हे (GIS survey) अंतर्गत 1 एप्रिल 2018 पासून रद्द करण्यात आली आहे. अशा मिळकतींना ह्यापूर्वी फरकाची बिले पाठवण्यात आली होती. अशा सर्व मिळकतींना 40 टक्के सवलतीचा लाभ 1 एप्रिल 2023 पासून पुढील कालावधीसाठी दिला जाणार आहे.

 

ही सवलत पुढे सुरु राहण्याकरिता मिळकत धारकाने 15 नोव्हेंबर 2023 पूर्वी PT-3 अर्ज पूराव्यासह कर आकारणी व कर संकलन खात्याकडे जमा करणे अनिवार्य आहे. मिळकत धारकाने संपूर्ण मिळकतकर भरला असेल तर जादा जामा झालेली रक्कम पीटी-3 अर्ज भरून दिल्यानंतर पुढील चार वर्षांच्या समान हप्त्यात समायोजित केली जाणार आहे.

 

अर्ज कोठे जमा करायचा
मिळकतधारकांच्या सोयीसाठी पीटी-3 अर्ज नजीकच्या संपर्क कार्यालय, क्षेत्रिय कार्यालय, मुख्य कार्यालय येथे नागरी सुविधा केंद्र अथवा पेठ निरीक्षक यांच्याकडे जमा करता येणार आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी ज्या निवासी मिळकतींना 40 टक्के सवलत देण्यात आली आहे, ज्यांची सवलत आजही कायम आहे त्यांनी पुन्हा पीटी-3 अर्ज भरण्याची आवश्यकता नाही.

 

अर्ज कुठे मिळणार?
40 टक्के सवलतीकरिता पीटी-3 अर्ज संपर्क कार्यालय, क्षेत्रीय कार्यालय,
मुख्य कार्यालय येथील नागरी सुविधा केंद्र किंवा पेठ निरीक्षक,
विभागीय निरीक्षक यांच्या कार्यालयात उपलब्ध करुन दिले आहेत.
तसेच propertytax.punecorporation.org या संकेतस्थलावर देखील अर्ज उपलब्ध करुन दिला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अर्जासोबत लागणारी कागदपत्रे
1. मिळकतीचा वापर स्वत: राहण्यासाठी करित असल्याबाबत सोसायटीचे नाहरकत पत्र (सोसायटी असेल तर)
2. मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, गॅस कार्ड, रेशन कार्ड
3. पुणे शहरात इतर ठिकाणी मिळकत असेल तर त्या मिळकतीच्या मिळकत कराच्या बिलाची प्रत
4. पीटी-3 अर्जासबोत 25 रुपये चलन फी भरून अर्ज सादर करावा.

 

Web Title :-  Pune PMC Property Tax | Filing of PT-3 application is mandatory to continue the 40 percent income tax exemption

 

हे देखील वाचा :

Pune water Supply | गुरुवारी शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरववठा बंद राहणार

Narhari Zirwal | ‘आमदार अपात्रतेचं प्रकरण माझ्याकडे येऊ द्या, आमदारांना…’, कोर्टाच्या निकालाआधीच झिरवळ यांचं मोठं विधान

Nana Patole | मविआच्या जागा वाटपाबाबत नाना पटोलेंचे मोठे विधान, म्हणाले-‘मविआमध्ये जागा वाटपाविषयी…’

 

Related Posts