IMPIMP

Pune Police Crime News | घोरपडे पेठेत क्रिकेट खेळणार्‍या युवकांनी सोनसाखळी चोरास पाठलाग करून पकडले; ACP सतीश गोवेकर, Sr PI संगीता यादव यांच्याकडून धाडसी तरूणांचा सत्कार

by nagesh
Pune Police Crime News | Youths playing cricket in Ghorpade Peth chased and caught the gold chain thief; Brave youth felicitated by ACP Satish Govekar, Sr PI Sangeeta Yadav

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police Crime News | पायी घरी जाणार्‍या डॉक्टर महिलेच्या (Lady Doctor) गळयातील सोन्याची चेन जबरदस्तीने चोरून (Chain Snatching) पळून जाणार्‍यास क्रिकेट खेळत असलेल्या युवकांनी पाठलाग करून पकडले. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता घोरपडे पेठे (Ghorpade Peth) येथे घडली. दरम्यान, युवकांनी चोरटयास खडक पोलिस स्टेशनच्या (Khadak Polcie Station) ताब्यात दिले आहे. साखळी चोरटयास पकडून पोलिसांच्या ताब्यात देणार्‍या धाडसी तरूणांचा पोलिसांच्या वतीने सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) आणि खडक पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता यादव (Sr PI Sangeeta Yadhav) यांनी पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला आहे. (Pune Police Crime News )

याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. अर्णिका अखिलेश सिंग Dr. Arnika Akhilesh Singh (29, रा. शांतीनगर सोसायटी, गुरूवार पेठ, पुणे – Guruwar Peth Pune) या मंगळवारी (दि.16) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घरी चालत जात होत्या. त्यावेळी चोरटयाने त्यांच्या गळयातील सोन्याची साखळी जबरदस्तीने चोरून पळ काढला. त्यावेळी डॉ. अर्णिका सिंग यांनी मदतीसाठी आरडा-ओरडा केला. घोरपडे पेठ येथे गोवर्धन विलास गोगावले (Govardhan Vilas Gogawale), हेमंत विनायक झेंडे (Hemant Vinayak Zende), उमेश काशीद (Umesh Kashid) आणि अभिषेक दिगंबर जाधव (Abhishek Digambar Jadhav) हे क्रिकेट खेळत (Playing Cricket) होते. त्यांनी डॉ. अर्णिका सिंग यांचा आवाज ऐकला आणि चोरटयाचा पाठलाग सुरू केला. काही क्षणातच युवकांनी चोरटयाच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, घटनास्थळी खडक पोलिस स्टेशनमधील पोलिस निरीक्षक (गुन्हे) राऊत (Police Inspector Raut) आणि त्यांचे पथक पोहचले होते. युवकांनी चोरटयास पोलिसांच्या ताब्यात दिले. (Pune Police Crime News)

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पोलिसांनी चोरटयाकडून सोनसाखळी जप्त केली. त्याच्याविरूध्द जबरी चोरीचा (Robbery In Pune) गुन्हा
First Information Report (FIR) दाखल करून महेश लक्ष्मण सावंत Mahesh Laxman Sawant
(रा. थेरगाव, वाकड – Thergaon Wakad) याला अटक करण्यात आली. दरम्यान, चोरी करून पळून
जाणार्‍या आरोपीस मोठया धाडसाने पकडणार्‍या युवकांचा पोलिस दलाच्या वतीने सहाय्यक पोलिस आयुक्त
सतीश गोवेकर, खडकच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता यादव यांनी पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला तसेच
त्यांचे आभार मानले. नागरिकांनी देखील अशा प्रकारे धाडस दाखवुन मदतीला पुढे यावे असे आवाहन खडक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Web Title :  Pune Police Crime News | Youths playing cricket in Ghorpade Peth chased and caught the gold chain thief; Brave youth felicitated by ACP Satish Govekar, Sr PI Sangeeta Yadav

Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी मविआची समिती स्थापन, ‘या’ नेत्यांचा समितीत समावेश; ठाकरे गटाकडून कोण? उद्धव ठाकरे घेणार निर्णय

Related Posts