IMPIMP

Vijay Shivtare | बारामतीत दादांना आव्हान देणारे शिवतारे आता सुप्रिया सुळे, रोहित पवारांना म्हणतायंत, ”आता अजितदादांचा ऐका, आणखी किती दिवस…”

by sachinsitapure

बारामती : Vijay Shivtare | बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) अपक्ष उभे राहण्याची घोषणा करत अजित पवारांविरूद्ध (Ajit Pawar) दंड थोपटणारे शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी मारलेली पलटी संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली होती. आता त्याच शिवतारेंनी बारामतीच्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर टीका केली आहे. अजित पवारांचे मागील काही वर्षांपासून ऐकत आहात त्यामुळे आतादेखील त्यांचेच ऐका, किती दिवस शरद पवारांच्या नावाने मते मागणार आहात, असा सवाल शिवतारे यांनी केला आहे.

विजय शिवातरे म्हणाले, संपूर्ण ताकदीने सुनेत्रा वहिनींचे (Sunetra Ajit Pawar) काम करत आहे. ८ हजार कार्यकर्ते सुनेत्रा पवार यांच्यासाठी काम करत आहेत. मतदारसंघात सगळीकडे पोहोचत आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांचा विजय पक्का आहे.

विजय शिवतारे म्हणाले, सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी महायुतीचे अनेक वरिष्ठ नेतेदेखील उपस्थित राहणार आहेत. शिवाय भोरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सभा घेणार आहे. आम्ही सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी काम करतो आहे. सुनेत्रा पवार चांगल्या मताधिक्यने निवडून येतील.

रोहित पवारांवर टीका करताना विजय शिवतारे म्हणाले, रोहित पवार लोकांना भावनिक करीत आहेत. जर भावाचा बदला घ्यायचा होता तर तुम्ही तिकडे जाऊन काम करायचे ना? पाच वर्षात तुम्ही काय काम केले तिकडे?, असा जाब शिवतारे यांनी विचारला.

तर सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना विजय शिवतारे म्हणाले, सुप्रिया सुळेंनी आपल्या मतदार संघात नेमके काय काम केले? रोहित पवारांनीदेखील काय काम केलं?, हे दाखवावे.

Solapur Lok Sabha | राम सातपुतेंना ‘उपरा’ म्हणत प्रणिती शिंदेंचे भाजपवर टीकास्त्र

Related Posts