IMPIMP

Pune Police MCOCA Action | वारजे माळवाडी परिसरात दहशत माजवणाऱ्या अविनाश उर्फ आव्या गंपले टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 103 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

by sachinsitapure
IPS Ritesh Kumar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police MCOCA Action | रस्त्यामध्ये तरुणाला व त्याच्या मित्राला अडवून हातातील लोखंडी हत्याराने व लाकडी बांबूने मारहाण करुन जबरदस्तीने खिशातील 700 रुपये काढून घेत परिसरात दहशत माजवणाऱ्या आविनाश उर्फ आव्या सुरेश गंपले व त्याच्या इतर 3 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 103 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केलेली आहे. (Pune Police MCOCA Action)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याप्रकरणी आविनाश सुरेश गंपले उर्फ आव्या (वय-19 रा. महादेव मंदिराजवळ, वारजे माळवाडी), सतीश पवन राठोड उर्फ सत्यपाल (वय-18 रा. विठ्ठलनगर पाण्याच्या टाकीजवळ, वारजे माळवाडी), विशाल संजय सोनकर (वय-19 रा. विद्याविहार सोसायटी, दांगट पाटील नगर, शिवणे) व एका अल्पवयीन मुलावर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) आयपीसी 394, 323, 341, 504, 506(2), 34 सह आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. तर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा (Pune Police MCOCA Action) अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील (IPS Pravin Kumar Patil) यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास कोथरुड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे करीत आहेत.

ही कामगिरी ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार)
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग
प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma), कोथरुड विभागाचे (Kothrud Division)
सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे (ACP Bhimrao Tele) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर (Senior PI Sunil Jaitapurkar), पोलीस निरीक्षक गुन्हे अजय कुलकर्णी
(PI Ajay Kulkarni), सहायक पोलीस निरीक्षक अमोल ओलेकर (API Amol Olekar),
पोलीस उपनिरीक्षक तृप्ती पाटील (PSI Tripti Patil), निगराणी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विशाल मिंडे,
पोलीस अंमलदार संभाजी दराडे, विजय खिलारी, नितीन कार्तुर्डे, ज्ञानेश्वर गुजर, रामदास गोणते यांच्या पथकाने केली.

Related Posts