IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | विनयभंग प्रकरणातील तरुणाची पिंपरी न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

by sachinsitapure
Molestation Case

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | तरुणीचा पाठलाग करुन तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तिच्यासोबत गैरवर्तन करुन विनयभंग केल्याप्रकरणी युनूस अब्बास शेख (वय-28) याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) आयपीसी 354, 354(ड), 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा प्रकार मे 2018 मध्ये घडला होता. या प्रकरणात आरोपी युनूस शेख याची 3 रे सह न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायाधीश मा. गो. मोरे (Judge M.G. More) यांनी निर्दोष मुक्तता (Acquittal) केली आहे. अशी माहिती अ‍ॅड. सिद्धांत मालेगावकर (Adv. Siddhant Malegaonkar) यांनी दिली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

काय आहे प्रकरण?

मॉर्डन कॉलेज, चिंचवड गाव व पिंपरी येथील आंबेडकर चौकात आरोपीने फिर्यादी तरुणीचा वेळोवेळी दुचाकीवरुन पाठलाग केला. तिच्यावर संशय घेऊन डिसेंबर 2017 मध्ये निगडी येथील मॉर्डन कॉलेज येथे मारहाण केली. यानंतर देखील आरोपीने पीडित तरुणीचा पाठलाग करुन तिला धमकी दिली. त्यानंतर 25 मे 2018 रोजी रात्री आठच्या सुमारास तिचा पाठलाग करुन पिंपरी येथील आंबेडकर चौकात तिच्यासोबत गैरवर्तन करुन विनयभंग (Molestation) केला. याप्रकरणी तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी तपास करुन 2018 मध्ये आरोपी विरोधात पिंपरी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

अ‍ॅड. सिद्धांत मालेगावकर यांचा युक्तिवाद

गेल्या सहा वर्षापासून हा खटला सुरु होता. आरोपीच्या मार्फत अ‍ॅड. सिद्धांत मालेगावकर यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
या प्रकरणामध्ये तपासी अधिकारी यांनी तपासाचे कागदपत्रे वाचून गुन्हा कसा घडला हे माहित झाल्याचे सांगितले. तसेच त्यांनी सांगितले की, घटनास्थळाच्या आजुबाजुच्या लोकांचे जबाब नोंदवले नाहीत व सीसीटीव्ही फुटेज मिळवले नाहीत. तपासी अधिकाऱ्यांनी मान्य केले की, त्यांना फिर्यादीला भेटणअयाचा प्रसंग आला नाही. आरोपीच्या विरोधात लावलेले आरोप सिद्ध केल्याबाबत त्यांच्याकडे प्रत्यक्ष पुरावा नाही. त्यामुळे आरोपीची निर्दोष मुक्तता करावी असा युक्तीवाद अ‍ॅड. मालेगावकर यांनी केला.

अ‍ॅड. सिद्धांत मालेगावकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी युनूस शेख याची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यात आरोपी युनूस शेख याच्यावतीने मालेगावकर अँड असोसिएट्स (Malegaonkar & Associates) तर्फे
अ‍ॅड. सिद्धांत मालेगावकर यांनी कामकाज पाहिले. तसेच अ‍ॅड. मजहर मुजावर, अ‍ॅड. वैष्णवी पवार, अ‍ॅड. कुणाल पगार,
अ‍ॅड. प्रेरणा बावीस्कर, अ‍ॅड. श्रद्धा जाधव, अ‍ॅड. शुभंकर मालेगावकर, अ‍ॅड. कुणाल सोनवणी व अमोल घावटे यांनी कामकाज पाहिले.

Related Posts