IMPIMP

Pune Police MPDA Action | आंबेगाव परिसरातील सराईत गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध, पोलीस आयुक्तांची 99 वी कारवाई

by sachinsitapure
Pune Police MPDA Action

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police MPDA Action | भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (Bharati Vidyapeeth Police Station) हद्दीत दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार आदित्य उर्फ सोन्या बंडु कांबळे Criminal Aditya alias Sonya Bandu Kamble (वय-20 रा. जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (Pune Police MPDA Action) स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 99 वी कारवाई आहे.

आदित्य कांबळे हा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह भारती विद्यापीठ, येरवडा व विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोखंडी कोयता, तलवार यासारख्या हत्यारासह जबरी चोरी, अपहरण, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.

आदित्य कांबळे याच्यावर एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी आदित्य कांबळे याला एम.पी.डी.ए कायद्यान्वये चंद्रपूर मध्यवर्ती कारागृह, चंद्रपूर येथे एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

ही कारवाई भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखा, पी.सी.बी. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.

Related Posts