पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police MPDA Action | कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीत दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार ईश्वर दत्ता चव्हाण Ishwar Dutta Chavan (वय- 27 रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए (Pune Police MPDA Action) कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 56 वी कारवाई आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
ईश्वर चव्हाण हा कोंढवा पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminals On Pune Police Records) आहे. त्याने कोंढवा व मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या (Market Yard Police Station) हद्दीत दहशत माजवली आहे. आरोपीने त्याच्या साथीदारांसह पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चाकु, लाकडी बांबु यासारख्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, खंडणी, गंभीर दुखापत, जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.
आरोपी ईश्वर चव्हाण याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Sr PI Santosh Sonwane) यांनी पोलीस आयुक्त यांना पाठवला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी ईश्वर चव्हाण याला एम.पी.डी.ए. कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. ही कमगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे शाखा, पी.सी.बी. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.टी. खोपरे (Sr PI A. T. khobare), पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली. (Pune Police MPDA Action)
पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी कामगिरी
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून शरीराविरुद्ध व
मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर मोक्का, तडीपार,
एमपीडीए यासारख्या कारवाया केल्या आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून 10 महिन्यात दहशत निर्माण करणाऱ्या
व सक्रिय गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत 56 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासात प्रथमच कमी कालावधीत अशा प्रकारची कारवाई झाली आहे.
पोलीस आयुक्तांनी आज पर्यंत पुणे शहरातील 56 गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.