IMPIMP

Pune Police News | पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडून 2 गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई, एका महिलेचा समावेश

by sachinsitapure
IPS Smartana Patil

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police News | परिमंडळ-2 च्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil ) यांनी लष्कर (Lashkar Police Station) आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या (Bharti Vidyapeeth Police Station) हद्दीतील प्रत्येक 1 अशा एकुण 2 गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली आहे. त्यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. (Pune Police Tadipari Action)

लष्कर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सुवर्णा भारत जाधव (45, रा. 2356, न्यु मोदीखाना, कॅम्प, पुणे) आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आशिष धमेंद्र प्रधान (20, रा. अंजनीनगर, कात्रज) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. (Pune Police News )

घरात घुसुन साहित्याचे नुकसान करणे, शिवीगाळ करणे, धमकी देणे, बेकायदेशीर हत्यार वापरणे, दहशत करणे, दुखापत करणे, मारहाण करणे, आदेशाचा भंग करून साथरोग पसरावणे, चोरून जुगार अड्डा चालविणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कायद्याचा दबाव रहावा म्हणून पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सुवर्णा भारत जाधव आणि आशिष धमेंद्र प्रधान यांच्यावर तडीपारीची कारवाई केली आहे.

दोघांनाही पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्हयातून तडीपार करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त प्रविण पवार,
अप्पर पोलिस आयुक्त प्रविण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी केली आहे.

Related Posts