IMPIMP

Pune Police |’ हे तरुणाई, तुझ्यासाठी..! भोंगा, दंगा, पंगा अन् जातीय तेढीपासून दूर रहा’, पुणे पोलिसांचे कवितेतून तरुणांना आवाहन

by nagesh
Nashik Central Jail | nashik central jail 10 to 12 prisoners attacked on policeman

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनराज्यामध्ये भोंग्यावरुन (Azaan Loudspeakers) राजकारण चांगलेच तापले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS
Chief Raj Thackeray) यांनी भोंग्याच्या विषयाला हात घालून मशिदींवरील भोंगे बंद करण्यासाठी आंदोलन (Agitation) छेडले आहे. राज्यभर
मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी मशिदींवरील भोंगे वाजतील त्याठिकाणी हनुमान चालिसा (Hanuman
Chalisa) लावा असे राज ठाकरे यांनी सांगितले. राज्यात असे वातावरण असताना इथे युवकांनी कोणत्याही आंदोलनात सहभागी होऊ नये असे आवाहन पुणे पोलिसांनी (Pune Police) केले आहे. तसेच भोंगा, पंगा, दंगा अन् जातीय तेढीपासून दूर राण्याचा सल्ला पुणे पोलिसांनी दिला आहे. पोलिसांनी (Pune Police) कवितेच्या माध्यमातून तरुणांना आवाहन केले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुणे पोलिसांच्या (Pune Police) अधिकृत ट्विटर हँडलवर ही कविता (Poetry) पोस्ट करण्यात आली आहे. या कवितेमध्ये पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे, तिथे तरुणांनी भोंगा, पंगा, दंगा अन जातीय तेढीपासून दूर राहिले पाहिजे असे सांगितले आहे.

 

पोलिसांनी लिहिलेली कविता…

पोलिसांनी ट्विट केलेल्या कवितेचे शिर्षक आहे ‘हे तरुणाई, तुझ्यासाठी..!’

हे तरुणाई, तुझ्यासाठी..!
पुण्यनगरी ही राजधानी असे सर्व शिक्षणाची
संस्कृती शिकण्या येथे मांदीयाळी तरुणाईची
नको आम्हा भोंगा, दंगा, पंगा अन् जातीय तेढ
सामाजिक सलोख्याची उभारु या मुहूर्तमेढ..!

गुण्यागोविंदे नांदण्या, एकमेकां समजून घेऊ, अवघे धरु सुपंथ..!
#पुणेपोलीस

 

Web Title :- Pune Police | stay away from bhonge riots and racial tensions pune police appeals to youth through poetry

 

हे देखील वाचा :

Pune Crime | फुटपाथवर झोपण्याच्या वादातून एकाचा खून, पुण्यातील नाना पेठेतील घटना

BJP MLA Ganesh Naik | भाजप आमदार गणेश नाईक यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

Sandeep Deshpande | महिला पोलीस जखमी झाल्याने संदीप देशपांडे अडचणीत; FIR दाखल होणार ?

 

Related Posts