IMPIMP

Pune Crime | फुटपाथवर झोपण्याच्या वादातून एकाचा खून, पुण्यातील नाना पेठेतील घटना

by nagesh
Pune Pimpri Crime | waiter was killed after getting rice in the mutton soup pimple saudagar sangvi police murder pune pimpri chinchwad crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | फुटपाथवर झोपण्याच्या वादातून एकाने अनोळखी नागरिकाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून खून (Murder) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून एकाला अटक (Pune Crime) केली आहे. पोलिसांनी (Pune Police) मोहित अमीर अंगीर Mohit Amir Angir (वय 30, रा. खडकी) याला अटक (Arrest) केली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत रिजवान शेख Rizwan Sheikh (वय – 41, रा. नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार नाना पेठेतील (Nana Peth) पदमजी चौकातील (Padmaji Chowk) फुटपाथवर मंगळवारी (दि.3) मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास घडला (Pune Crime) होता.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंगीर व अनोळखी व्यक्ती दोघेही भिक्षेकरी असून फिरस्ते आहेत. पदमजी चौकाजवळील दुल्हा दुल्हन कब्रस्तानच्या भिंतीलगतच्या फुटपाथवर मोहित अंगीर हा झोपण्यासाठी आला होता. त्याच ठिकाणी एक जण झोपत असे. मध्यरात्रीच्या सुमारास त्याने मोहित अंगिर याला तेथे झोपण्यास विरोध करुन शिवीगाळ (Swearing) केली. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला.

 

तेव्हा रागाच्या भरात मोहित याने तेथे असलेला सिमेंटचा गट्टू त्याच्या डोक्यात मारला.
या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) नेले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यु झाला.
पोलिसांनी मोहित अंगीर याला अटक केली आहे. खून झालेल्या फिरस्त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.
सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव (API Praveen Jadhav) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Murder in Nana Peth Pune

 

हे देखील वाचा :

BJP MLA Ganesh Naik | भाजप आमदार गणेश नाईक यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

Sandeep Deshpande | महिला पोलीस जखमी झाल्याने संदीप देशपांडे अडचणीत; FIR दाखल होणार ?

MNS Chief Raj Thackeray | ‘हे कायमचे थांबले नाही तर हनुमान चालिसा लावली जाणारच’; राज ठाकरेंचा पुन्हा इशारा

 

Related Posts