IMPIMP

Pune Police Viral Video | गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या व्हायरल व्हिडीओची महिला आयोगाकडून गंभीर दखल, पोलीस आयुक्तांना दिले ‘हे’ निर्देश

by nagesh
Pune Police Viral Video Senior police inspector rajesh puraniks bullying has been noticed by the maharashtra state women commission

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Police Viral Video | शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रमुख (Pune Police Crime Branch SS Cell) आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik) यांनी एकास बंद खोलीत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुराणिक नागरिकास मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात (Pune Police Viral Video) प्रचंड व्हायरल झाला. यानंतर आता राज्य महिला आयोगाने (State Commission for Women) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत एका महिलेने केलेल्या तक्रारीवरुन महिला आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांना (Pune Police Commissioner) संबंधित प्रकाराचा कसून तपास (Enquiry) करण्याचे निर्देश दिले आहेत.

पुणे पोलिसाच्या मारहाणीच्या व्हिडिओची (Pune Police Viral Video) दखल महिला आयोगाने घेतल्याने पुराणिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
त्यांच्यावर पोलीस खात्याकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
नागरिकांना अमानुष पद्धतीने मारहाण (Beating) तसेच अत्यंत अर्वाच्च शब्दात केलेल्या शिवीगाळीमुळे (Abuse) पुराणिक वादात सापडले आहेत.
पुराणिक नागरिकांना मारहाण करतानाचा व्हिडिओ अज्ञात व्यक्तीने बनवला आणि तो सोशल मीडियात व्हायरल झाला.

एका महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली.
याबबतीत एका महिलेची तक्रार महिला आयोगास प्राप्त झाली असून यापुर्वीही एका महिलेला अशीच मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणी योग्य तपास करण्याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत,
अशी माहिती महिला आयोगाने ट्विट करुन दिली आहे.

 

Web Title :- Pune Police Viral Video | Senior police inspector rajesh puraniks bullying has been noticed by the maharashtra state women commission

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update 

हे देखील वाचा :

Related Posts