IMPIMP

Pune Purandar Airport | विमानतळ ग्रस्तांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन; जमिनी न देण्यावर ठाम, ठरावही मंजूर

by nagesh
Pune-Purandar Airport | Land acquisition of Purandar Airport as per MIDC Act

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Purandar Airport | पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या सात गावांमधील ग्रामपंचाय सदस्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना बुधवारी भेटून विमानतळाला कोणत्याही परिस्थितीत जमिनी न देण्याबाबत निवेदन दिले. तसेच प्रकल्पाला जमिनी देण्यास विरोध असून याबाबतचे ठराव सातही ग्रामपंचायतींकडून संमत करण्यात आले आहेत. (Pune Purandar Airport)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे राजे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळा कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस आले होते. त्यावेळी त्यांना सातही ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींनी निवेदन देऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

 

याबाबत पारगावचे बापू मेमाणे म्हणाले, ‘पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस बुधवारी आले होते. त्यामुळे विमानतळ प्रस्तावित करण्यात आलेल्या सातही गावांतील ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्रित येऊन निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीसांनी उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू दिले नाही. त्यामुळे अखेर दोन प्रतिनिधींनी जाऊन निवेदन दिले. कोणत्याही परिस्थितीत विमानतळासाठी जमिनी देणार नसून त्याबाबतचे ठरावही संमत करण्यात आले आहेत.’ (Pune Purandar Airport)

 

दरम्यान, भूसंपादन करण्यापूर्वी स्थानिकांशी चर्चा करून अहवाल सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांना देण्यात आल्या आहेत.
तसेच भूसंपादन प्रक्रियेपूर्वीची कार्यवाही करण्याचे आदेशही महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला (एमएडीसी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले आहेत.
त्यामुळे एकीकडे विमानतळ प्रकल्पाला गती मिळत असताना दुसरीकडेप्रकल्प प्रस्तावित केलेल्या सातही गावांमधील नागरिक आक्रमक झाले आहेत.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

निवेदनात काय
पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी, वनपुरी, एखतपूर आणि कुंभारवळण सात या गावांतील सात हजार एकरपेक्षा जास्त जागा आहे.
ही गावे पुरंदर उपसा सिंचन योजनेतील लाभार्थी आहेत.
बागायती जमिनी असून उदरनिर्वाहाचे शेती हेच साधन असल्याने त्या देण्यास विरोध असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
या सातही गावांनी ग्रामसभेमध्ये ठराव करून विमानतळ प्रकल्पासाठी जमिनी न देण्याचा ठराव संमत केला आहे.

 

Web Title :- Pune Purandar Airport | Statement of Airport Victims to Deputy Chief Minister; Adamant on not giving land, resolution also approved

 

हे देखील वाचा :

Yakub Memon Grave | याकूब मेमन कबरीवरुन राजकारण तापलं ! मग तुम्ही दाऊदला समर्थन करता का?, भाजपच्या आरोपांना शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर

Pune News | जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायत सदस्यांसाठी ६९६, तर सरपंचपदासाठी २१२ जण रिंगणात – निवडणुकींचे चित्र स्पष्ट

Pune Crime | कोथरुडमध्ये ATM मधून पैसे काढण्यास मदतीच्या बहाण्याने 76 वर्षाच्या ज्येष्ठाची फसवणूक

 

Related Posts