IMPIMP

Yakub Memon Grave | याकूब मेमन कबरीवरुन राजकारण तापलं ! मग तुम्ही दाऊदला समर्थन करता का?, भाजपच्या आरोपांना शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर

by nagesh
Yakub Memon Grave | yakub menon grave beautification controversy shiv sena leader ambadas danve answer to bjp ashish shelar chandrashekhar bawankule criticism

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मुंबई बॉम्बस्फोटातील (Mumbai Bomb Blast) दहशतवादी याकूबची कबर (Yakub Memon Grave) सजवण्यामगे महाविकास आघाडीचा हात असल्याचा आरोप भाजपने (BJP) केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भेटण्यासाठी वेळ नव्हता. अशावेळी याकूब मेमन याच्या कबरीला (Yakub Memon Grave) अलिखित परवानगी दिली. उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व (Hindutva) त्यांनी सरकारसाठी किती अ‍ॅडजस्ट केले हे यातून स्पष्ट होते, असा थेट आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी माफी मागीवी अशी मागणी भाजपने केली आहे. यावर आता शिवसेनेने (Shivsena) प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवसेना नेते आणि राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी या वादावर म्हटलं की, याकूब मेमनच्या कबरीचं (Yakub Memon Grave) उदात्तीकरण करणे दुर्दैवी आहे. ज्याने कुणी हा प्रकार केला असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. मात्र अशाप्रकारे उद्धव ठाकरेंवर टीका करताना मसूदला अफगाणिस्तानला कुणी सोडलं? दाऊदला (Dawood Ibrahim) फरफटत भारतात आणू असं कोणत्या पक्षाचे नेते म्हणाले? निवडणुकीत सत्ता आल्यानंतर दाऊदला जेलमध्ये टाकू असं म्हटलं गेलं मग अद्याप ते झाले नाही म्हणजे तुम्ही दाऊदला समर्थन करता का? असं आम्हालाही बोलता येतं.

 

याकूब मेमनचं समर्थन मराठी माणूस, मुंबईकर करणार नाही. याकूबच्या कबरीचं उदात्तीकरण निषेधार्हच आहे.
2014 पासून दाऊदला जेलमध्ये टाकू बोलता मग त्यांनी आजपर्य़ंत का आणलं नाही? तुमच्यात हिंमत नाही का?
चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार (Ashish Shelar) नादानपणाचा आरोप करत आहेत.
याकूब मेमन बाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे.
ज्यांनी काश्मीरमध्ये मुफ्ती मेहबूबा सोबत (Mufti Mehbooba) सत्ता उपभोगली त्यांनी आम्हाला शिकवू नये.
ज्यांनी खुलेपणे पाकिस्तानचं समर्थन केले होते असा टोला अंबादास दानवे यांनी भाजपला लगावला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय आहे प्रकरण?

मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीवर मार्बल आणि लायटींग लावण्यात आली आहे. मुंबईच्या बडा कब्रिस्तान (Bada Cemetery Mumbai) येथे हा प्रकार समोर आला आहे.
मेमनच्या कबरीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर यावरुन उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
याकूबच्या कबरीचं सुशोभिकरण महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात झाले.
या कबरीचं उदात्तीकरण करणाऱ्यांची नावे समोर आली पाहिजेत हा देशद्रोहाचा प्रकार असून ज्यांनी सुशोभिकरणासाठी परवानगी दिली त्यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्याची मागणी भाजपने केली आहे.

 

Web Title :- Yakub Memon Grave | yakub menon grave beautification controversy shiv sena leader ambadas danve answer to bjp ashish shelar chandrashekhar bawankule criticism

 

हे देखील वाचा :

Pune News | जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायत सदस्यांसाठी ६९६, तर सरपंचपदासाठी २१२ जण रिंगणात – निवडणुकींचे चित्र स्पष्ट

Pune Crime | कोथरुडमध्ये ATM मधून पैसे काढण्यास मदतीच्या बहाण्याने 76 वर्षाच्या ज्येष्ठाची फसवणूक

Gold Rate Today | सोन्याचे दर ‘जैसे थे’, तर चांदी महागली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

 

Related Posts