IMPIMP

Pune Crime | कोथरुडमध्ये ATM मधून पैसे काढण्यास मदतीच्या बहाण्याने 76 वर्षाच्या ज्येष्ठाची फसवणूक

by nagesh
Pune Crime | A 76-year-old man was duped on the pretext of helping him withdraw money from an ATM in Kothrud

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन–  Pune Crime | एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका ७६ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकास मदत करण्याचा बहाणा करुन कार्ड (ATM Card) बदली करुन चोरट्याने त्यांच्या खात्यातून पैसे काढून फसवणूक (Cheating Case) केली. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी कोथरुडमध्ये (Kothrud) राहणार्‍या एका ७६ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २१२/२२) दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे भारतीय सैन्य दलातून २००६ मध्ये निवृत्त झाले आहेत. ते २७ ऑगस्ट रोजी दुपारी पौड रोडवरील आनंदनगर (Anand Nagar, Paud Raod, Pune) येथील एस बी आय बँकेच्या (SBI Bank ATM Center) एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. ते पैसे काढत असताना तोंडावर मास्क घातलेला एका तरुण आत आला व त्याने साहेब मी तुम्हाला पैसे काढण्यास मदत करतो.

 

तुमचा एटीएम कार्ड माझ्याकडे द्या, असे बोलून त्याने त्यांच्याकडील कॅनरा बँकचे (Canara Bank) एटीएम कार्ड
घेतले (Pune Crime). त्यांना पीन नंबर विचारला. त्यानंतर साहेब तुमचा एटी एम कार्ड डिक्लाइन म्हणून येत
आहे. नेटवर्क प्राब्लेम आहे, तुम्ही नंतर येऊन पैसे काढा, असे सांगत त्यांचे एटीएम कार्ड मशीनमध्ये ठेवून निघून
गेला. फिर्यादी यांनी मशीनमधील कार्ड काढून पाहिले तर त्यांच्या कॅनरा बँकेच्या कार्डाऐवजी त्यात एस बी आयचे
कार्ड होते. त्यांनी बाहेर येऊन त्याचा शोध घेतला असता़ तो मिळून आला नाही. त्यानंतर दहा मिनिटांनी त्यांच्या
खात्यातून ३ वेळा १० हजार रुपये व ५ हजार रुपये असे ३५ हजार रुपये काढून घेण्यात आल्याचा मेसेज त्यांना आला.
कोथरुड पोलीस तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A 76-year-old man was duped on the pretext of helping him withdraw money from an ATM in Kothrud

 

हे देखील वाचा :

Gold Rate Today | सोन्याचे दर ‘जैसे थे’, तर चांदी महागली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Pune Pimpri Crime | ‘मी मन्या घोडके पिंपरी चिंचवडचा भाई’ असे म्हणत तरुणावर कोयत्याने वार

Ration Card धारकांसाठी मोठी बातमी, या लोकांना मिळणार नाही रेशन, कार्ड सुद्धा होईल रद्द!

 

Related Posts