IMPIMP

Pune News | जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायत सदस्यांसाठी ६९६, तर सरपंचपदासाठी २१२ जण रिंगणात – निवडणुकींचे चित्र स्पष्ट

by nagesh
Pune News | Digital media in Pune were denied passes to reporters while Digital India was being empowered

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या ४८५ सदस्य पदांसाठी ९३० अर्ज दाखल झाले होते. त्यातील २३४ जणांनी माघार घेतली. तर ६१ सरपंचपदांसाठी ३१५ अर्जांपैकी १०३ जणांनी माघार घेतली. ग्रामपंचायत सरपंचपदाची निवड थेट मतदारांतून होत असून जिल्ह्यातील ६१ जागांसाठी ३१५ उमेदवारांनी अर्ज केला होता. अर्ज माघारीचा मंगळवारी हा शेवटचा दिवस होता. १०३ जणांनी अर्ज माघारी घेतले. आता भोरमधील दोन जागांसाठी सहा, खेडमध्ये पाच जागांसाठी दहा, आंबेगावमध्ये १८ जागांसाठी ६६ आणि आणि जुन्नर तालुक्यातील ३६ सरपंच पदासाठी १२८ उमेदवार रिंगणात आहेत. (Pune News)

 

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) राज्यातील ११६६ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी १४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील बार्पे बुद्रूक आणि चांदखेड (ता. मुळशी) दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे, असे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले. (Pune News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सदस्यपदांच्या ४८५ जागांसाठी निवडणूक होत असून ९२१ अर्ज वैध ठरले होते.
त्यातील २३४ जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता भोर तालुक्यातील १८ जागांसाठी ३६ उमेदवार रिंगणात आहेत.
खेडमधील ३५ सदस्यांसाठी ५०, आंबेगाव तालुक्यातील १४४ जागांसाठी २०३ आणि जुन्नरमधील २८८ जागांसाठी ३९८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
१८ सप्टेंबर रोजी मतदान होणार असून १९ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

 

Web Title :- Pune News | 696 for 61 gram panchayat members in the district, 212 for the post of sarpanch – the election picture is clear

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कोथरुडमध्ये ATM मधून पैसे काढण्यास मदतीच्या बहाण्याने 76 वर्षाच्या ज्येष्ठाची फसवणूक

Gold Rate Today | सोन्याचे दर ‘जैसे थे’, तर चांदी महागली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Pune Pimpri Crime | ‘मी मन्या घोडके पिंपरी चिंचवडचा भाई’ असे म्हणत तरुणावर कोयत्याने वार

Ration Card धारकांसाठी मोठी बातमी, या लोकांना मिळणार नाही रेशन, कार्ड सुद्धा होईल रद्द!

 

Related Posts