IMPIMP

Pune Railway Police | स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन पुणे लोहमार्ग पोलिसांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन; गहाळ झालेले मोबाईल मुळ मालकांना परत

by sachinsitapure
Pune Railway Police | Organized various programs by Pune Lohmarg Police to celebrate Independence Day; Return lost mobiles to original owners

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Railway Police | यंदा देशाच्या स्वातंत्र्याचा (Independence Day) अमृत महोत्सवी वर्धापन दिन (Amrit Mahotsav Anniversary) साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरामधील शाळा, कॉलेजेसमध्ये सजावट करण्यात आली होती. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्वच शासकीय कार्यालयांवर रोषणाईसह सजावट करण्यात आली आहे. जिल्ह्यातही स्वातंत्र्यदिनी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन पुणे लोहमार्ग पोलिसांनी (Pune Railway Police) विविध विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

गहाळ झालेले मोबाईल मुळ मालकांना परत

पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल विविध गुन्ह्यातील व प्रवाशांचे गहाळ झालेले 45 मोबाईल (Mobiles) पुणे लोहमार्ग पोलीस दलातील पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन हस्तगत केले आहेत. हस्तगत केलेले 45 मोबाईल, मोबाईल धारकांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन परत करण्यात आले. चोरीस गेलेले व गहाळ झालेले मोबाईल परत मिळाल्याने मोबाईल धारकांनी रेल्वे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करुन आभार मानले. (Pune Railway Police)

46 पोलीस अंमलदारांना पदोन्नती

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे (15th August Independence Day) औचित्य साधून 33 पोलीस अंमलदार यांना पोलीस हवालदार (Police Constable) ते सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर (ASI), तसेच 13 पोलीस अंमलदार यांना पोलीस नाईक (Police Naik) ते पोलीस हवालदारांना शासन नियमानुसार पदोन्नती देण्यात आली आहे.

शालेय विद्यार्थ्यांसाठी शस्त्रांचे प्रदर्शन

स्वातंत्र्यदिनानिमित्त पुणे लोहमार्ग पोलिसांकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शस्त्रांच्या प्रदर्शनाच्या (Modern Weapons Exhibition) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात तज्ज्ञ व्यक्तींकडून शस्त्रांच्या विविध भागांची व कार्याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यामध्ये 5.56 इन्सास रायफल, 9mm कार्बाइन मशीन, AK-47, ग्लोक पिस्टल, MP-5, 7.62 mm SLR, 12 बोअर, गॅसगन सारख्या आधुनिक शस्त्रांचा समावेश करण्यात आला होता.

प्रदर्शनास भेट देण्यासाठी आलेल्या विद्यार्थी व शिक्षकांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे (SP Shrikant Dhiware), पोलीस उप अधीक्षक चंद्रकांत भोसले (DySP Chandrakant Bhosale), उप विभागीय अधिकारी देवीकर (Devikar) व अधिकारी, अंमलदार यांचे आभार मानले.

अभिनेते अजय पुरकर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण

लोहमार्ग पुणे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या ध्वजारोहणाच्या (Flag Hoisting)
कार्यक्रमासाठी ‘फत्तेशिकस्त’, ‘पावणखिंड’ अशा मराठी चित्रपटात काम केलेले व नव्याने येणाऱ्या ‘सुभेदार’ या
चित्रपटातील सुभेदार ही भुमिका साकारणारे अभिनेते अजय पुरकर (Actor Ajay Purkar) हे प्रमुख पाहुणे म्हणुन
उपस्थित होते. यावेळी ध्वजारोहणासाठी उपस्थित असलेल्या सर्वांना फळांचे वाटप करण्यात आले.

लहान मुलांसोबत ध्वजारोहण

जीपीआर पुणे पोलिसांकडून SOFOSH- Society of Friends of the Sassoon Hospital Pune या संस्थेत जावून
तेथील लहान मुलांसोबत ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर मुलांना फळांचे वाटप करण्यात आले.

Web Title : Pune Railway Police | Organized various programs by Pune Lohmarg Police to
celebrate Independence Day; Return lost mobiles to original owners

Related Posts