IMPIMP

Punit Balan Group | क्रिकेटर अंकित बावणेचा ‘पुनीत बालन ग्रुप’शी सहकार्य करार

by sachinsitapure
Punit Balan Group | cricketer ankit bawnes cooperation agreement with punit balan group

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Punit Balan Group | महाराष्ट्राचा धडाकेबाज फलंदाज अंकित बावणे आता ‘पुनीत बालन ग्रुप’शी (Punit Balan Group) जोडला गेला आहे. या दोघांमध्ये नुकताच सहकार्य करार झाला असून त्याअंतर्गत आता बावने याच्या क्रिकेट खेळासाठीची सर्वोतोपरी मदत ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून केली जाणार आहे. यामुळे रणजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या बावणे याला देशाच्या संघातही झळकण्यास मदत होणार आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

‘पुनीत बालन ग्रुप’ने आतापर्यंत विविध खेळाडूंना खेळासाठी मदत केली आहे. यामध्ये आता अंकित बावणे याचाही समावेश झाला आहे. वयाच्या १५ व्या वर्षी किकेटमध्ये पदार्पण करणार्‍या अंक़ित बावने यांने चमकदार कामगिरी करत आपले कौशल्य दाखविले आहे. अंडर १८ मध्येही त्याने उत्तम खेळी केली होती. नुकत्याच झालेल्या पहिल्या ‘महाराष्ट्र प्रिमिअर लीग’मध्ये पुनीत बालन यांच्या ‘कोल्हापुर टस्कर्स’ टिमकडून बावणे याने चांगली कामगिरी केली. या स्पर्धेतील टी-20 मधील पहिले शतक ठोकण्याचा बहुमानही त्याने मिळविला. क्रिकेटमधील बावने यांची कामगिरी लक्षात घेऊन ‘पुनीत बालन ग्रुप’ने त्याच्याबरोबर सहकार्य करार केला आहे. या अंतर्गत बावणे याला क्रिकेटसाठी लागणारी सर्वोतोपरी मदत या ग्रुपकडून दिली जाणार आहे. यामाध्यमातून बालन यांनी आणखी एका प्रतिभावान खेळाडूला जोडले आहे. (Punit Balan Group)

‘पुनीत बालन ग्रुप’ने आतापर्यंत अनेक खेळाडूंना सहकार्य करून त्यांची कारकीर्द उंचावण्यास मोलाची मदत केली आहे.
पुरेशा साधनांअभावी अनेक गुणी खेळाडूंचे करियर संपुष्टात आलेलीही अनेक उदाहरणे आहेत.
या पार्श्वभूमीवर ‘पुनीत बालन ग्रुप’चं योगदान हे अनन्यसाधारण आहे.
अशा ग्रुपशी मी जोडला गेलो याचा मनापासून आनंद आहे. यामुळे माझ्या करिअरला नक्कीच मदत होईल, यात शंका नाही.

अंकित बावणे Ankit Bawne (क्रिकेटपटू)

“अंकित बावने हा गुणवंत खेळांडु आहे. एमपीएल स्पर्धेत त्याने आपली कामगिरी दाखवून दिली आहे.
‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून तो आमच्याशी जोडला गेला याचा निश्चितपणे आनंद आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर अशीच जोरदार कामगिरी करून तो भारताचे नाव उज्वल करेल, अशी खात्री आहे.

पुनीत बालन (युवा उद्योजक)
Young Entrepreneur Puneet Balan

Web Title :  Punit Balan Group | cricketer ankit bawnes cooperation agreement with punit balan group

Reliance Jio | महाराष्ट्रामध्ये रिलायन्स जिओचा दबदबा कायम ! मे महिन्यात 4 लाख ग्राहकांची भर – ट्राय

Pune Crime News | पुणे : गुन्हे शाखेकडून कारच्या काचेवर चिठ्ठी लावून 10 लाखांची खंडणी मागणार्‍याला अटक

Related Posts