IMPIMP

Pune Crime News | पुणे : गुन्हे शाखेकडून कारच्या काचेवर चिठ्ठी लावून 10 लाखांची खंडणी मागणार्‍याला अटक

by sachinsitapure
Pune Crime News | Pune Crime Branch arrests man who asked for ransom of 10 lakhs by putting a note on car window

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | कोरेगाव पार्क येथील हॉटेल (Hotels In Koregaon Park) बाहेर कारच्या काचेवर चिठ्ठी लावून 10 लाख रुपयांची खंडणी (Extortion Case) मागणार्‍यास गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने अकलुज तालुक्यातील उंबरे गावातून अटक केले आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

श्रीनाथ यलाप्पा शेडगे Srinath Yalappa Shedge (वय २५, रा. मु. पो. उंबरे, ता. अकलुज, जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. तो पुण्यात झोमॅटो डिलिव्हरी बॉय (Zomato Delivery Boy) म्हणून काम करतो.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीमधील व्यावसायिक कोरेगाव पार्क येथील हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आले होते. जेवण करुन बाहेर आले असता त्यांच्या कारला एक पाकिट चिटकवलेले आढळून आले. त्यात तुम्ही 10 लाख रुपये दिले नाही तर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला जीवे मारून टाकेल अशी धमकी दिली होती. फोन करुन त्यांना जेवणाच्या डब्यात पैसे टाकून ते कोरेगाव पार्क येथे आणून देण्याची धमकी दिली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास युनिट २ चे पथक करत होते. पोलीस अंमलदार गजानन सोनुने व पुष्पेद्र चव्हाण यांना धमकी देणारा आरोपी हा अकलुज येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने अकलुज पोलिसांच्या मदतीने शेडगे याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून कर्जबाजारी झाला असल्याने त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले. पुढील तपासासाठी त्याला कोरेगाव पार्क पोलिसांच्या (Koregaon Park Police Station) ताब्यात देण्यात आले. (Pune Crime News)

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे (ACP Sunil Tambe),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई (PI Nandkumar Bidwai) यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे (PSI Nitin Kamble), पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, अमोल सरडे , गजानन सोनुने ,
पुष्पेंद्र चव्हाण, उत्तम तारू, साधना ताम्हाणे, निखिल जाधव, मोसिन शेख, नागनाथ राख या पथकाने केली आहे.

Web Title :  Pune Crime News | Pune Crime Branch arrests man who asked for ransom of 10 lakhs by putting a note on car window

Related Posts