IMPIMP

Punit Balan Group | टेनिसपटू अंकिता रैना आणि पुनीत बालन ग्रुपमध्ये सामंजस्य करार

by nagesh
Punit Balan Group | MoU between tennis player Ankita Raina and Puneet Balan group

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Punit Balan Group | सन २०१६ च्या दक्षिण आशियाई टेनिस स्पर्धेत एकेरी व मिश्र दुहेरी अशा दोन्ही गटात सुवर्णपदक पटकावणाऱ्या अंकिता रैना व पुनीत बालन ग्रुप (Punit Balan Group)
यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) यांनी दिली.

 

मूळ काश्मीरी पंडित असणाऱ्या अंकिताचा जन्म गुजरातमध्ये झाला. मोठा भाऊ अंकित रैनाला टेनिस खेळाताना पाहून अंकिता प्रभावित झाली आणि पुण्यातील पीवायसी येथे प्रशिक्षक हेमंत कोद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सरावाला सुरुवात केली. कामगिरीचा आलेख सातत्याने उंचावताना अंकिताने अनेक शालेय तसेच विभागीय स्पर्धांमध्ये आपले वर्चस्व गाजविले. (Punit Balan Group)

आयटीएफ सर्किट स्पर्धेत खेळताना अंकिताने तब्बल ११ एकेरीत तर १८ मिश्र दुहेरीत विजेतेपदे पटकावली आहेत. सन २०१८ मध्ये अंकिताने आशियाई स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. यापूर्वी केवळ भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने या स्पर्धेत पदक कमावले होते. त्याच वर्षी झालेल्या $25K स्पर्धेत विजेतेपद मिळवताना आंतर राष्ट्रीय रँकींगमध्ये १८१ वे स्थान पटकावले.

 

सन २०२१ सालच्या फिलिप आयलंड चषक स्पर्धेत पहिली डब्यूटीए सिंगल सामन्यात विजेतेपद पटकावले. या लढतीत अंकिताने इटलीच्या एलिसाबेटा कोकियारेटोला पराभूत करताना इतिहासात नाव कोरले.

“अंकिता सारखे खेळाडू भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावत असतात.
अशा प्रतिभावान खेळाडूंशी जोडलो गेल्याचा आनंद होत आहे.
उद्या याच खेळाडूंकडून प्रेरणा घेऊन नवीन खेळाडू तयार होतील आणि राज्याचं आणि देशाचं नाव उंचावतील, असा विश्वास आहे”.

– पुनीत बालन, उद्योजक 

 

Web Title :- Punit Balan Group | MoU between tennis player Ankita Raina and Puneet Balan group

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

NCP National Executive Committee | राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर ! जितेंद्र आव्हाडांवर मोठी जबाबदारी; नबाव मलिकांना डच्चू

Lumpy Skin Disease Virus | मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, आता जनावरांनाही क्वारंटाईन करणार

Chandrakant Patil | ‘हॅलो चंद्रकांतदादा…’ भर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा चंद्रकांत पाटलांना फोन

 

Related Posts