IMPIMP

Chandrakant Patil | ‘हॅलो चंद्रकांतदादा…’ भर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा चंद्रकांत पाटलांना फोन

by nagesh
Chandrakant Patil | cm eknath shinde calls chandrakant patil requests to inaugurate pune bridge maharashtra politics news

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) माध्यमातून उभारण्यात आलेल्या पाषाण-सुस खिंड
भागातील उड्डाणपुलाचे (Pashan-Sus Flyover) लोकार्पण आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते
करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपस्थित राहणार होते. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना
कार्यक्रम सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला. खराब हवामानामुळे आपल्याला मुंबईहून पुण्याला कार्यक्रमाला उपस्थित राहता
येणार नाही, त्यामुळे माझ्या वतीने तुम्हीच पुलाचे उद्घाटन करा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटील यांना केली. त्यामुळे या पुलाचा लोकार्पण
सोहळा मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाइन उपस्थितीत पार पडला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 जोडणारा हा उड्डाणपुल तयार झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑनलाईन उपस्थित होते. त्यांनी मला फोनवरुन सुचवलं की तुम्हीच या कार्यक्रम सोहळ्याचे उद्घाटन करा. कार्यक्रमास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होत्या. याप्रसंगी आमदार भीमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir), माजी महापौर मुरलीधर मोहोळ (former mayor Muralidhar Mohol), महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार (Additional Municipal Commissioner Kunal Khemnar), रवींद्र बिनवडे (Ravindra Binwade), विलास कानडे (Vilas Kanade), माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasane), माजी सभागृहनेते गणेश बीडकर (Ganesh Bidkar) आदी उपस्थित होते.

 

पाषाण-सूसला जोडणारा उड्डाणपूल हा हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्कच्या (Hinjewadi IT Park) बाजूला होणाऱ्या वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार असून वाहतूक कोंडीची (Traffic Jams) समस्या सुटण्यास बऱ्याच अंशी मदत होईल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

चांदणी चौकातील (Chandni Chowk) सहापदरी पूल झाल्यावर या भागातील बरेचसे प्रश्न मार्गी लागतील असे सांगून पाटील म्हणाले, या परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि त्यासाठी वाहतूक वळवण्यासाठी काही बाबतीत हा पूल उपयुक्त होईल. पुणे शहराची गतीने वाढ होत आहे. उद्योग, व्यापार, शैक्षणिक क्षेत्र आदींमध्ये शहर पुढे राहण्यासाठी रस्ते, उडाणपूल, मेट्रो, पूल आदी पायाभूत सुविधांची निर्मिती गरजेची आहे. चांगल्या प्रकारचे घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ पाण्याची व्यवस्था, शांतता आदीमुळे सर्वांनाच हे शहर राहण्यासाठी सुरक्षित वाटते.

 

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, येत्या काळात शहरातील अनेक प्रश्न मार्गी लावायचे आहे.
मेट्रो, सर्व भागात 24 तास समप्रमाण पाणी पुरवठा (Water Supply), जायका प्रकल्प (JICA Project) आदी प्रकल्प गतीने पूर्ण करायचे आहेत.
पाषाण- सूस भागातील घनकचरा प्रकल्प हलवण्याची नागरिकांची मागणी असून येथील लोकप्रतिनिधींनी नागरी वस्तीपासून दूर असलेली योग्य जागा शोधावी.
या जागेचे संपादन करून तेथे हा प्रकल्प स्थलांतरीत करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
उद्घाटन करण्यात आलेल्या पूलाला राजमाता जिजाऊ भोसले (Rajmata Jijau Bhosale) यांचे नाव देण्यात येईल आणि राजमाता जिजाऊंचा पुतळाही या ठिकाणी उभा केला जाईल, असेही ते म्हणाले.

 

असा आहे उड्डाणपूल

 

41 कोटी रुपये खर्चातून उभारलेला 470 मीटर लांबीचा हा उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्ग क्र. 4
(National Highway 4) वर पाषाण-सूसला जोडणारा आहे. पाषाण-कात्रज, हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्क,
मुळशीला जोडणारा हा पूल वाहतुकीसाठी मोठा उपयुक्त ठरणार आहे. हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारी आणि
मुळशीकडून येणारी वाहतूक सुकर होणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Chandrakant Patil | cm eknath shinde calls chandrakant patil requests to inaugurate pune bridge maharashtra politics news

 

हे देखील वाचा :

Vedanta-Foxconn Project | वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाचे भूमिपूजन कधी झाले, फोटो दाखवा, आशिष शेलारांचे शिवसेनेला चॅलेंज

Pune Pimpri Crime | महिलेचे फोटो मॉर्फ करुन विनयभंग, 2 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनवर पिंपरी पोलीस ठाण्यात FIR

Pune Crime | वारजे माळवाडी परिसरात दहशत पसरवणारा अट्टल गुन्हेगार स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांकडून आतापर्यंत 77 जणांवर कारवाई

 

Related Posts