IMPIMP

NCP National Executive Committee | राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर ! जितेंद्र आव्हाडांवर मोठी जबाबदारी; नबाव मलिकांना डच्चू

by nagesh
Pune Grampanchayat Election Results 2022 | Gram Panchayat elections in Pune district dominated by NCP; 46 out of 61 village panyatis in custody

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  NCP National Executive Committee | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. जमीन घोटाळ्यात सापडलेल्या माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे मंत्रिपद राष्ट्रवादीने काढले नाही. मात्र पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी मधून (NCP National Executive Committee) त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन (National Convention) 10-11 सप्टेंबरला राजधानी दिल्ली येथे पार पडले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार (Sharad Pawar) यांची एकमताने निवड करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना कार्यसमिती सदस्य, स्थायी निमंत्रित, प्रदेशाध्यक्ष, आघाडीच्या संघटना, विभाग इत्यादींसह पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार शरद पवार यांनी कार्यकारिणीची यादी जारी केली आहे.

 

नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे आघाडीचे प्रवक्ते (Spokesperson) होते. मात्र मलिक यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून डच्चू देण्यात आला आहे. तर जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रीय सरचिटणीस (National General Secretary) पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

 

राष्ट्रीय पदाधिकारी

 

1. राष्ट्रीय अध्यक्ष – शरद पवार
2. राष्ट्रीय उपाध्यक्ष (National Vice President) – प्रफुल्ल पटेल (Praful Patel)
3. राष्ट्रीय सरचिटणीस – सुनील तटकरे (Sunil Tatkare)
4. राष्ट्रीय सरचिटणीस – योगानंद शास्त्री (Yogananda Shastri)
5. राष्ट्रीय सरचिटणीस – के के शर्मा (KK Sharma)
6. राष्ट्रीय सरचिटणीस – पीपी मोहम्मद फैजल (PP Mohammad Faisal)
7. राष्ट्रीय सरचिटणीस – नरेंद्र वर्मा (Narendra Verma)
8. राष्ट्रीय सरचिटणीस – जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)
9. राष्ट्रीय कोषाध्यक्ष (National Treasurer) – वाय पी त्रिवेदी (YP Trivedi)
10. स्थायी सचिव – एस आर कोहली (SR Kohli)
राष्ट्रीय सचिव – राजीव झा (Rajeev Jha), हेमंत टकले (Hemant Takle), सच्चिदानंद सिंग (Satchidananda Singh), ब्रिजमोहन श्रीवास्तव (Brijmohan Srivastava), राजेंद्र जैन (Rajendra Jain)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्रवक्ते कोण …

 

प्रवक्ते म्हणून नरेंद्र वर्मा (Narendra Verma) यांची सरचिटणीस, राष्ट्रीय प्रवक्ते आणि प्रभारी माध्यम, ब्रिजमोहन श्रीवास्तव (Brijmohan Srivastava) यांची राष्ट्रीय सचिव आणि प्रवक्ते, धीरज शर्मा (Dheeraj Sharma) यांची राष्ट्रीय अध्यक्ष युवक काँग्रेस व प्रवक्ते, सोनिया दोहान (Sonia Dohan) यांची राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि प्रवक्त्या, सीमा मलिक (Seema Malik) यांची राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि प्रवक्ते क्लाईड क्रिस्टो (Clyde Christo), राष्ट्रीय प्रवक्ते यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

 

Web Title :- NCP National Executive Committee | jitendra awhad get big responsibility in ncps national office bearers secretary spokesperson sharad pawar finalize list nawab malik omitted

 

हे देखील वाचा :

Lumpy Skin Disease Virus | मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, आता जनावरांनाही क्वारंटाईन करणार

Chandrakant Patil | ‘हॅलो चंद्रकांतदादा…’ भर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा चंद्रकांत पाटलांना फोन

Vedanta-Foxconn Project | वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाचे भूमिपूजन कधी झाले, फोटो दाखवा, आशिष शेलारांचे शिवसेनेला चॅलेंज

 

Related Posts