IMPIMP

Queen Elizabeth II | आपल्या पाठीमागे किती संपत्ती सोडून गेल्या ब्रिटीश क्विन एलिजाबेथ-2, वारसाहक्काने कुणाला मिळणार सर्व मालमत्ता?

by nagesh
Queen Elizabeth II | queen elizabeth ii death total assets of queen and what is income source now holds the empire

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचे गुरुवारी स्कॉटलंडमधील बाल्मोरल कॅसल येथे निधन झाले. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. 1952 मध्ये एलिझाबेथ द्वितीय, ब्रिटनची राणी बनल्या जेव्हा त्यांचे वडील जॉर्ज सहावे यांचे निधन झाले. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्या डोक्यावर मुकूट आला. त्या जगातील एकमेव महिला होत्या ज्यांना परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट किंवा व्हिसाची आवश्यकता नव्हती. सध्या, 15 सार्वभौम राष्ट्रांच्या राणी असलेल्या राणी एलिझाबेथ-2 (Queen Elizabeth II Net Worth) अब्जावधींची संपत्ती मागे ठेवली आहे. (Queen Elizabeth II)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

किती आहे महाराणीची संपत्ती?

 

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निव्वळ संपत्तीबाबत वेगवेगळ्या रिपोर्टमध्ये अनेक दावे करण्यात आले आहेत. Fortune च्या मते, राणी एलिझाबेथ यांनी 500 मिलियन डॉलर (रु. 39,858,975,000) संपत्ती मागे ठेवली आहे. प्रिन्स चार्ल्स राजा झाल्यावर ही मालमत्ता वारसाहक्काने मिळेल.

 

 

कसे होत होते महाराणीचे उत्पन्न?

 

ब्रिटनच्या राजघराण्याला करदात्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असे, ज्याला सॉव्हरेन ग्रँट म्हणून ओळखले जाते. हे राजघराण्याला वार्षिक आधारावर दिले जाते. राजा जॉर्ज तृतीय यांच्या काळात हे अनुदान सुरू झाले. त्यांनी संसदेत एक करार केला होता. अशा प्रकारे त्यांनी स्वतःसाठी आणि भावी पिढ्यांसाठी निधी सुरक्षित करण्याचा मार्ग मोकळा केला. हा करार, मूळत: सिव्हील लीस्ट म्हणून ओळखला जात होता, जो 2012 मध्ये सॉव्हरेन ग्रँट म्हणून बदलला गेला. (Queen Elizabeth II)

 

2021 आणि 2022 मध्ये, सॉव्हरेन ग्रँटची रक्कम 86 दशलक्ष पौंडांपेक्षा जास्त निश्चित करण्यात आली होती. हा निधी अधिकृत प्रवासाच्या खर्चासाठी, मालमत्तेची देखभाल आणि राणीच्या घराच्या – बकिंगहॅम पॅलेसच्या देखभालीसाठी वाटप केला जातो.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राजघराण्यातील अचल संपत्ती

 

फोर्ब्सच्या मते, 2021 पर्यंत राजघराण्याकडे सुमारे 28 बिलियन डॉलर्सची अचल संपत्ती होती, जी विकता येऊ शकत नाही.

द क्राउन इस्टेट : 19.5 बिलियन डॉलर

बकिंगहॅम पॅलेस : 4.9 बिलियन डॉलर

द डची ऑफ कॉर्नवॉल : 1.3 बिलियन डॉलर

द डची ऑफ लँकेस्टर : 748 मिलियन डॉलर

केन्सिंग्टन पॅलेस :630 मिलियन डॉलर

स्कॉटलंडची क्राउन इस्टेट : 592 मिलियन डॉलर

कोणाला मिळणार राणीची संपत्ती?

 

बिझनेस इनसाइडरच्या मते, राणीने तिची गुंतवणूक, कला संग्रह, दागिने आणि रियल इस्टेट होल्डिंग्समधून 500 मिलियन डॉलरपेक्षा जास्त वैयक्तिक संपत्ती कमावली होती. यामध्ये सँडरिंगहॅम हाऊस आणि बाल्मोरल कॅसलचा समावेश आहे. आता त्यांचा मृत्यू झाला असल्याने बहुतांश संपत्ती प्रिन्स चार्ल्सला दिली जाईल.

 

 

मोठा मुलगा चार्ल्सने सांभाळली गादी

 

आता एलिझाबेथ द्वितीय गेल्यानंतर तिचा मोठा मुलगा चार्ल्स ब्रिटनचा राजा झाला आहे. 73 वर्षीय चार्ल्स हे ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलंड या 15 देशांचे प्रमुखही बनले आहेत. राजघराण्याच्या नियमांनुसार, एलिझाबेथ द्वितीयच्या निधनानंतर चार्ल्सला कारभाराची सूत्रे हाती घ्यायची होती. नियमांनुसार, एलिझाबेथच्या मृत्यूनंतर लवकरच चार्ल्सला नवीन राजा घोषित केले आहे. लंडनच्या St James’s Palace मध्ये, ज्येष्ठ खासदार, सिव्हिल सर्व्हंट, मेयर यांच्या उपस्थितीत चार्ल्स यांना औपचारिकपणे राजा बनवले जाईल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Queen Elizabeth II | queen elizabeth ii death total assets of queen and what is income source now holds the empire

 

हे देखील वाचा :

Use Basil For Natural Face Mask | इम्युनिटीच नव्हे, त्वचेसाठी सुद्धा जबरदस्त आहे तुळस, जाणून घ्या तुळशीचे 5 DIY हॅक्स

Amravati Love Jihad Case | काल पोलिसांना जबाब, आज तरुणीचा नवनीत राणांवर गंभीर आरोप, माझी बदनामी थांबवा… लव्ह जिहाद बनावट!

German Shepherd Attack Zomato Delivery Boy | लिफ्टमध्ये झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या प्रायव्हेट पार्टवर कुत्र्याने घेतला चावा, नोएडा-गाझियाबादनंतर मुंबईतील व्हिडिओ व्हायरल

 

Related Posts