IMPIMP

Rajan Salvi | ‘विजय नक्की, शिवसेना व्हीपनुसार मतदान झालं नाही तर ते अपात्र होतील’; राजन साळवींचा बंडखोर आमदारांना इशारा

by nagesh
MLA Rajan Salvi | shivsena mla rajan salvi explanation on joining eknath shinde camp

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइनRajan Salvi | राज्याच्या घडामोडीत राजकीय संघर्ष काही कमी होताना दिसत नाही. आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून (Maharashtra Assembly Speaker Election) भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) चुरशीची शक्यता आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी (MLA Rajan Salvi) यांनी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, अर्ज दाखल केल्यानंतर साळवी यांनी शिंदे गटातील आमदारांना इशारा दिला आहे. ‘शिवसेनेच्या व्हीपनुसार जर बंडखोर आमदारांनी मला मतदान केलं नाही, तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल,’ असं राजन साळवी यांनी म्हटलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राजन साळवी (Rajan Salvi) म्हणाले, “महाविकास आघाडीतर्फे विधानसभा अध्यक्षपदासाठी मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मला विश्वास आहे की महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व आमदार मला मतदान करतील आणि विजय आमचाच होईल. शिवसेनेच्या व्हीपनुसार जर बंडखोर आमदारांनी मला मतदान केलं नाही, तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल.”

 

दरम्यान, भाजपकडून राहुल नार्वेकर हे निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत.
तर महाविकास आघाडीमधून शिवसेनेचे राजन साळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
त्यामुळे उद्या होणा-या निवडणुकीत राजन साळवी आणि राहुल नार्वेकर यांच्यात लढत असणार आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय होतोय की, भाजपचा? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उत आला आहे.

 

Web Title :- Rajan Salvi | my victory is for sure if the voting did not take place according to the shiv sena whip rebel mlas will be disqualified say rajan salvi

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे, परंतु फडणवीसांवर असेल लक्ष; जाणून घ्या ’मास्टरस्ट्रोक’ मागील डाव

Deepak Kesarkar | शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांना नेते पदावरून हटवणं बेकायदेशीर, कायदेशीर उत्तर देऊ’ – दीपक केसरकर

Maharashtra Rains | खुशखबर ! राज्यात पाऊस सक्रिय ! 7 जुलैपासून पुण्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता – IMD

 

Related Posts