IMPIMP

Rajiv Gandhi Case | राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींची सुटका करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

by nagesh
Rajiv Gandhi Case | rajiv gandhi assassination case supreme court directs release of convicts including nalini srihar rp ravichandran

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात (Rajiv Gandhi Case) जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) भोगणाऱ्या नलिनी श्रीहरन (Nalini Sriharan) आणि आरपी रविचंद्रन (RP Ravichandran) यांची सुटका करण्याचे आदेश आज (दि.11) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहे. राजीव गांधी हत्या प्रकरणात (Rajiv Gandhi Case) 30 वर्षांहून अधिक काळ हे आरोपी जेलमध्ये होते. त्या आधारावरच त्यांची सुटका करण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

राजीव गांधी हत्या प्रकरणातील (Rajiv Gandhi Case) जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या नलिनी श्रीहरन सुटकेची मागणी करत कोर्टात धाव घेतली होती. नलिनी यांनी 17 जून रोजी मद्रास हायकोर्टाने (Madras High Court) दिलेल्या आदेशाला आव्हान दिले. मुदतीपूर्वी सुटकेची याचिका फेटाळून लावली होती.

 

 

सुटका करण्यात आलेली दोषी महिला नलिनी सध्या पॅरोलवर कारागृहाच्या बाहेर आहे. याआधी मद्रास उच्च न्यायालयाने दोषी नलिनीची सुटकेची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याआधी राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी ए जी पेरारिवलन (A G Perarivalan) याची 18 मे रोजी सुटका केली होती.
पेरारिवलन याने राजीव गांधींच्या हत्या प्रकरणात 30 वर्ष शिक्षा भोगलेली आहे.
पेरारिवलनने संविधानातील कलम (Article in the Constitution) 142 चा आधार घेत आपल्या सुटकेची मागणी केली होती.
दोषी नलिनीने पेरारिवालनच्या याच सुटकेचा दाखल देत तिच्याही सुटकेची मागणी केली होती.

 

Web Title :- Rajiv Gandhi Case | rajiv gandhi assassination case supreme court directs release of convicts including nalini srihar rp ravichandran

 

हे देखील वाचा :

Nitesh Rane | हातात भगवा घेतला म्हणून कोणी हिंदुत्ववादी होत नाही – नितेश राणे

Nitin Gadkari | ‘वेगळ्या विदर्भाचा वाद पुन्हा चर्चेत’, आंदोलन समिती मागणार गडकरींसह १० खासदारांचा राजीनामा

Prasad Oak | ‘गोदावरी’ सिनेमा पाहून भारावून गेलेल्या प्रसाद ओकने चित्रपटाबद्दल लिहिली ‘ही’ खास पोस्ट

 

Related Posts